-
हिंडेनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर गंभीर आरोप झाले. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी विधानं केली आहेत.
-
पवार शुक्रवारी (७ एप्रिल) एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. त्यावेळ त्यांनी हिंडेनबर्ग-अदाणी प्रकरणात नेमकी काय वक्तव्यं केली त्याचा हा आढावा…
-
एका परदेशी कंपनीच्या अहवालाने देशात खळबळ उडाली. अशाप्रकारची वक्तव्ये याआधीही काही लोकांनी दिले होते. काही दिवस संसदेत यावरून गदारोळही झाला होता – शरद पवार
-
आम्ही तर या कंपनीचं कधी नावही ऐकलं नव्हतं. त्या कंपनीची पार्श्वभूमी काय माहिती नव्हतं – शरद पवार
-
अशा विषयावर देशात गदारोळ झाला तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते हे दुर्लक्षित करता येणार नाही – शरद पवार
-
हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतं – शरद पवार
-
या प्रकरणाच्या तपासात स्वतः सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतला. त्यांनी समिती नियुक्त केली – शरद पवार
-
त्या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, जाणकार, तज्ज्ञ अशा लोकांचा समावेश आहे. त्यांना मार्गदर्शक सूचना आणि वेळ देण्यात आला – शरद पवार
-
तसेच याचा तपास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं – शरद पवार
-
दुसरीकडे विरोधी पक्षांची मागणी होती की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची नियुक्त करा – शरद पवार
-
जर संसदेची समिती नियुक्त केली, तर आज संसदेत बहुमत सत्ताधारी पक्षाचं आहे. ही मागणी सत्ताधारी पक्षाच्या विरोधातीलच आहे – शरद पवार
-
अशावेळी सत्ताधारी भाजपाशी संबंधित विषयाची चौकशी करणाऱ्या समितीत भाजपाचं बहुमत राहिलं असतं. त्यामुळे सत्य बाहेर येणार की नाही याविषयी संशय निर्माण होऊ शकतो – शरद पवार
-
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा विचार केला, तर तिथं सत्ताधारी किंवा विरोधकांशी संबंधित कुणी नाही. त्यांनी चौकशी केली तर अधिक सत्य देशासमोर येईल – शरद पवार
-
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तपास करण्याची घोषणा केल्यानंतर संसदेच्या समितीकडून याची चौकशी करण्याला महत्त्व राहिलं नाही, त्याची आवश्यकता राहिली नाही – शरद पवार
-
विषय व्यक्तिगत झाले आणि काही महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्षही करण्यात आलं – शरद पवार
-
संसदेत कोणत्या विषयावर जास्त संघर्ष करण्याची आवश्यकता असते, तर देशवासीयांसमोर काय प्रश्न आहेत ते मुद्दे महत्त्वाचे आहेत – शरद पवार
-
बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती आणि असे अनेक प्रश्न आहेत – शरद पवार
-
एखाद दुसऱ्या दिवशी राजकीय विषय येतात. मात्र, जे सामान्य लोकांना त्रास देणारे मुद्दे आहेत त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही – शरद पवार
-
ज्वलंत विषय संसदेत उपस्थित न करण्यासाठी मी कोणत्याही एका पक्षाला दोष देणार नाही. कारण यात केवळ काँग्रेस पक्ष नव्हता, तर डावे आणि इतर पक्षही यात होते – शरद पवार
-
सर्वांनी मिळून महत्त्वाचे विषय बाजूला करून राजकीय विषयांना जास्त महत्त्व देण्यात आलं. त्यामुळे सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं – शरद पवार
-
तुम्ही ज्या कुणावर टीका करत असाल, टार्गेट करत असाल त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने अधिकार वापरले असतील तर त्यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार तुम्हाला लोकशाहीने दिला आहे हे १०० टक्के मान्य आहे – शरद पवार
-
पण काहीही अर्थ नसताना उगाचच हल्ला करायचा, हे मला समजू शकत नाही – शरद पवार
-
पेट्रोकेमिकल क्षेत्रात अंबानी यांनी मोठं योगदान दिलं आहे देशाला त्याची गरज नाही का? वीज क्षेत्रात अदाणी यांचं मोठं योगदान आहे देशाला वीज लागणार नाही का? – शरद पवार
-
देशाच्या गरजा लक्षात घेऊन देशाचं नाव त्या क्षेत्रात उंचावणारे हे लोक आहेत – शरद पवार
-
धारावीत अनेक लघुउद्योग आहेत, तिथले लोक वेगळे आहेत. विविध प्रकारचे व्यवसाय करतात, उद्योगधंदे चालवतात – शरद पवार
-
अशा लोकांना चांगल्या पायाभूत सुविधा मिळणं आवश्यक आहे, त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढेल. तसेच या भागासाठीही ती फायद्याची बाब आहे – शरद पवार
-
मुंबईत आल्यानंतर विमानातून उतरल्यावर धारावीच्या झोपडपट्ट्या दिसतात हा गैरसमज लवकरच दूर होईल. धारावीचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून तिथे सुरू आहे. त्यामुळे मला वाटते ती चांगली गोष्ट आहे – शरद पवार
-
मला संसदेत येऊन जवळपास ५६ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. संसद आणि विधानसभेत मी अनेक गोष्टी सातत्याने केल्यात, बऱ्याचदा गोंधळ पाहिला आहे – शरद पवार
-
पण हा प्रकार घडल्यानंतर संध्याकाळी चर्चा सुरू व्हायची, दुसऱ्या दिवशी सकाळी संसदीय कामकाज मंत्र्यांची जबाबदारी असते की, सभागृहात कोंडी फोडून त्यावर चर्चा घडवून आणायची – शरद पवार
-
दुसऱ्या दिवशी बसून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न व्हायचा. पण आता तसं काही दिसत नाही. चर्चेची ही प्रक्रिया आजकाल होतच नाही – शरद पवार
-
मला आठवते गुलाम नबी आझाद संसदीय कामकाज मंत्री होते, तेव्हा विरोधी पक्ष खूप मजबूत होता. अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही – शरद पवार
-
मात्र गुलाम नबी आझाद हे विरोधी पक्षनेत्यासोबत बसून काही तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचे आणि सभागृहाचे कामकाज चालूच असायचे – शरद पवार
-
आजकाल जसा टोकाचा संघर्ष करणं योग्य नाही, तसंच चर्चेची प्रक्रिया थांबवणंही योग्य नाही, या दोन्ही गोष्टी घडल्यामुळे संपूर्ण अधिवेशन वाया गेलं – शरद पवार
-
सर्व छायाचित्र – संग्रहित

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral