-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत प्रभू श्री राम यांचे दर्शन घेतले आहे.
-
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
-
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं मोठ्या जल्लोषात अयोध्येत स्वागत करण्यात आले.
-
तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची रॅली काढत मोठे शक्तीप्रदर्शनेही केले आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
-
सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वत्र भगवे वातावरण झाले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
-
सर्वजण अतिशय खुश आणि आनंदी आहेत.
-
तसेच, जंगी स्वागत केल्याबद्दल अयोध्येतील जनतेचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
-
सर्वच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. राम जन्मभूमित उत्साह असतोच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
हा उत्साह एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हिंदुत्ववादी सरकार राज्यात आल्याचा उत्साह असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल