-
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक नवीन दावा केला आहे. बाबरी मशिद पाडली, तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता, असं विधान चंद्रकांत पाटील व्यक्त केले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
-
चंद्रकांत पाटील म्हणाले, “बाबरी मशिद पाडून तिथे प्रभू श्री रामाचे छोटेसे मंदिर उभारण्यात आले. तेव्हा संजय राऊत तिथे होते का?”
-
“साडे पाचशे वर्ष तेव्हा असलेल्या राजांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्याविना हिंदुंनी राम मंदिरासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने दुर्गा वाहिनीच्या नावाने संघर्ष केला,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
-
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आमच्या पाठीशी होती. पण, ते उघडपणे सहभागी नव्हते. संघाने आपल्या विचारांच्या संघटनांना कामे वाटून दिली होती.”
-
“बाबरी मशिदीचा ढाचा पडल्यावर बाळासाहेब ठाकरे म्हणाले, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना तिथे ढाचा पाडण्यासाठी गेली होती का?,” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
-
“कारसेवक हे हिंदू होते. हे कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या नेतृत्वाखाली बाबरी पाडण्यासाठी गेले होते,” असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
-
“बाबरी पाडली, त्यात कदापि शिवसैनिक नव्हते. कारसेवकांची सेवा करण्यासाठी महिनाभर अयोध्येत होतो. सुशील मोदी, हरेंद्र कुमार आणि मी असे तीन राष्ट्रीय सरचिटणीस अयोध्येत होतो.”
-
“आम्ही सभा आणि संतांची व्यवस्था तिथे करायचे. आम्हाला सांगण्यात आलं होतं, ढाचा पडो किंवा न पडो, शेवटचा माणूस बाहेर पडल्यावरच तुम्ही तिथून निघायचे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
-
“आम्ही बाहेर पडल्यावर अयोध्येच्या रस्त्यावर कुत्री भुंकत होती. अशा वातावरणात आम्ही केले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी म्हटले, याची जबाबदारी मी घेतो. मग, तुम्ही तुमचे चार सरदार पाठवले होते का?,” असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य