-
अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपा बरोबर जातील, असा दावा केला. यानंतर बुधवारचा (१२ एप्रिल) दिवस अजित पवारांभोवतीच फिरला.
-
दमानियांच्या दाव्यावर अजित पवारांनी केवळ एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ईडीकडून क्लीन चिट, ठाकरे-पवार भेट, जीवाला धोका असल्याचा भाजपा पदाधिकाऱ्याचा आरोप, नाना पटोलेंची टीका या सर्वच मुद्द्यांवर भूमिका व्यक्त केली. त्याचा हा आढावा…
-
मी भाजपाबरोबर जाणार असं वक्तव्य करणाऱ्या अंजली दमानियांएवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे – अजित पवार
-
मला आणि सुनेत्रा पवार यांना जरंडेश्वर कारखाना प्रकरणात ईडीकडून क्लीनचिट मिळाल्याच्या बातमीत अजिबात तथ्य नाही – अजित पवार
-
ती चौकशी सुरू आहे. त्यात कुठल्याही प्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही – अजित पवार
-
ही बातमी कशाच्या आधारे दिली हे मला कळायला मार्ग नाही, पण मी सर्वांना स्पष्ट सांगू इच्छितो की, अशाप्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही – अजित पवार
-
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतील तपशील मला माहिती नाही – अजित पवार
-
मला शरद पवार फक्त म्हणाले होती की, उद्धव ठाकरे मला भेटायला येणार आहेत – अजित पवार
-
बरेच दिवस त्या दोघांची भेट नसल्यामुळे उद्धव ठाकरे भेटायला आले असतील – अजित पवार
-
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असे दोघेही भेटायला आले होते. तास दीड तास त्यांच्यात चर्चा झाल्याचं बातम्यांवरून माहिती मिळाली आहे – अजित पवार
-
मध्यंतरी वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली. त्यानंतर मविआतील घटकपक्षांमध्ये अंतर पडते की काय अशा बातम्याही पसरवल्या गेल्या. त्यावर या बैठकीत चर्चा झाली असावी – अजित पवार
-
मला नेमके विषय काय होते माहिती नाही, पण १ मे रोजी मुंबईतील बीकेसीला जे सभा होणार आहे त्यावर चर्चा झाली हे मला माहिती आहे – अजित पवार
-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमी अशाप्रकारची वक्तव्ये करतात – अजित पवार
-
अनेकदा आम्हालाही काही माहिती मिळते. अशी वक्तव्ये केल्याने कारण नसताना महाविकासआघाडीमध्ये अंतर पडू शकतं – अजित पवार
-
नाना पटोलेंनी या गोष्टी माध्यमांमध्ये बोलण्याऐवजी जयंत पाटील यांच्याशी बोलावं. माझ्याशी बोलावं. उद्धव ठाकरेंशी बोलावं, आदित्य ठाकरेंशी बोलावं. त्यातून मार्ग निघू शकतो. त्यामुळे या गोष्टी बंद केल्या पाहिजे – अजित पवार
-
मविआची सभा होईल तेव्हा मी जरूर या गोष्टी तिथं मांडेल – अजित पवार
-
माझ्या माहितीप्रमाणे गोंदियात भाजपा-राष्ट्रवादी अशाप्रकारची कुठलीही आघाडी झालेली नाही – अजित पवार
-
फक्त सकाळी लातूरचे काही कार्यकर्ते आले होते, ते म्हणाले की, लातूर तालुक्यात मविआला विचारलं जात नाही. काँग्रेस त्यांच्यापरीने निर्णय घेतं, मग आम्ही काय करायचं – अजित पवार
-
मी लातूरच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की, तुम्ही जयंत पाटलांच्या कानावर घाला – अजित पवार
-
तसेच बाकीच्यांनी निर्णय घेऊन एकदा त्यांना सांगा की, तुम्ही आम्हाला बरोबर घेणार नसाल तर शेवटी आम्हाला आमचा काही विचार करावा लागेल – अजित पवार
-
आम्ही इतरांना पुढे घेऊन जायचं का असा प्रश्न काँग्रेसलाच विचारण्यास कार्यकर्त्यांना सांगितलं – अजित पवार
-
काँग्रेसअंतर्गत विषयासंदर्भात मी बोलू इच्छित नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ज्यांनी-त्यांनी आपल्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आपापल्या स्तरावर सोडवावे – अजित पवार
-
आम्हाला सूचना करण्याचा अधिकार नाही आणि नाक खुपसायचाही अधिकार नाही. मात्र आघाडी टिकावी असे वाटते – अजित पवार
-
कुणाला एखाद्यामुळे जीवाला धोका असेल आणि ज्याने तक्रार दिली असेल तर सरकारने संरक्षण दिले पाहिजे – अजित पवार
-
गंभीर धोका असेल तर स्टेनगनधारी संरक्षण दिले पाहिजे – अजित पवार
-
तुम्हाला तरी वाटते का की, माझ्यामुळे कुणाला धोका आहे. मी कायदा व सुव्यवस्था पाळणारा, संविधान पाळणारा, असा माणूस आहे असे – अजित पवार
-
गारपीठीने शेतकऱ्यांचे एक लाख एकरापेक्षा जास्त नुकसान कालपर्यंत झाले होते. अजुनही गारपीठ आणि अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे – अजित पवार
-
यामुळे उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. गारपीठ जी होत आहे त्याने अक्षरशः बर्फाचा थर जमा होत आहे – अजित पवार
-
त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मंगळवारी पत्र देऊन प्रतिहेक्टर ५० हजार रुपये आणि एक लाख रुपये प्रति हेक्टर फळबागांसाठी द्या अशी मागणी केली आहे – अजित पवार
-
सर्व छायाचित्र – संग्रहित

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”