-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील संसद भवन भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
-
यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लादेखील उपस्थित होते.
-
यावेळी बोलताना, बाबासाहेबांनी देशातील वंचितांसाठी आपले जीवन संपूर्ण जीवन समर्पित केले, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.
-
तसेच पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उपस्थित बौद्ध धर्मगुरूंची भेटही घेतली .
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करत त्यांना आदरांजली वाहिली.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचे विचार आपण सर्वांनी अंगीकारायला हवे, असं आवाहन यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
-
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली. तसेच त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकाही केली. देशात आज लोकशाही संपत चालली असून सरकार विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही म्हटलं जातं, असं ते म्हणाले.
-
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज चैत्यभूमीवर जात बाबासाहेबांना अभिवादन केले.
-
यावेळी राज्यपाल रमेश बैस तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते.

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार