-
रविवारी (१६ एप्रिल) ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला.
-
या घटनेचे पडसाद तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसून येत आहेत.
-
यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून शिंदे सरकारकडून श्रीसेवकांच्या मृत्यूची आकडेवारी लपवली जात असल्याच आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.
-
दरम्यान, या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्र सोडलं.
-
पालघरमध्ये जमावाने तीन साधूंची हत्या केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने डहाणूमध्ये जत्रा भरवली होती. पण श्रीसेवकांच्या मृत्यूनंतर फडणवीसांच्या डोळ्यात साधी सहानुभूतीही दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.
-
जे लोक पालघरमधील साधूंच्या हत्येनंतर छाती बडवत होते, तेच लोक आज ते लोक आज खारघरमधील श्रीसेवकांच्या मृत्यूनंतर गप्प बसले आहेत. आता देवेंद्र फडणवीसांची माणुसकी मेली आहे का? त्यांना आता मन शिल्लक आहे की नाही? असेही ते म्हणाले.
-
यावेळी बोलताना त्यांनी श्रीसेवकांच्या मृत्यूचा आकडा लपवत असल्याचा आरोपही शिंदे सरकारवर केला.
-
या घटनेतील श्रीसेवकाच्या मृत्यूंचा आकडा पुढे येऊ नये, यासाठी पैशांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर सुरू आहे. श्रीसेवकांच्याबाबत चर्चा होऊ नये, त्यांच्या कुटुंबियांनी जास्त काही बोलू नये, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो आहे. असे ते म्हणाले.
-
ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यांचे शवविच्छेदन अहवालही समोर आले आहेत. त्यानुसार हे लोक उपाशी होते. त्यांच्या पोटात पाणी सुद्धा नव्हतं. त्यांच्या खाण्यापिण्याची कोणतीही सोय या सरकारने केली नव्हती. इतकं निर्दयी हे सरकार आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
-
दरम्यान, नितीन राऊतांवरील कारवाईवरूनही त्यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं. नितीन देशमुख पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढत होते. त्याचा सरकारला त्रास व्हायचं कारण काय? असा प्रश्न त्यांनी शिंदे सरकारला विचारला.
-
बाळापूर भागातील तीन महिन्याचं बाळही खारयुक्त पाणी पिते. या पाण्यामुळे लोकांचं जीवन संकाटत आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाण्याची योजना मंजूर केली होती. मात्र फडणवीसांनी त्या योजनेवर स्थगिती आणली, असेही ते म्हणाले.
-
नितीन देशमुख हेच खारयुक्त पाणी फडणवीसांना दाखवण्यासाठी नागरपूरला जात होते होते, पण सरकारने त्यांना अडवलं. राज्यात नेमकं चाललंय काय? हे सरकार मोगलाई परत आणताय का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख