-
उद्धव ठाकरे यांची उद्या जळगावातील पाचोऱ्यात सभा होणार आहे. त्यापूर्वी आज संजय राऊतांनी जळगामध्ये जाऊन सभेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.
-
यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंची सभा, अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आणि गुलाबराव पाटलांनी दिलेली धमकी यासह विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केलं.
-
उद्धव ठाकरेंच्या सभेबाबत बोलताना ते म्हणाले, उद्या पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यासाठी ते दुपारी जळगावात दाखल होतील. शिवाय इतर कार्यक्रमांनाही ते हजेरी लावतील.
-
याबरोबरच माजी आमदार अरुणतात्या पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरे यांच्याहस्ते होईल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
-
दरम्यान, काल अजित पवारांनी एका मुलाखतीत बोलताना राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं विधान केलं होते.
-
अजित पवारांच्या या विधानावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री होण्यास कोणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणात असून, मंत्रीही होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं, असे ते म्हणाले.
-
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही खोचक टीका केली. अनेकजण लायकी नसताना जुगाड करून मुख्यमंत्री होतात, असं ते म्हणाले.
-
पुढे बोलताना त्यांनी गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या धमकीवरही भाष्य केलं.
-
संजय राऊतांनी मर्यादेत बोलावं, नाही तर सभेत घुसून सभा उधळून लावू, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिली होता. यासंदर्भात बोलताना, आम्ही काल जळगावात आल्यानंतर रेल्वे स्टेशनवर शिवसैनिकांची गर्दी होती. या गर्दीत कुठं उंदीर घुसलाय का आम्ही बघत होतो, असा त्यांनी गुलाबराव पाटलांना लगावला.
-
तसेच शिवसैनिकांच्या गर्दी कोणाची घुसायची हिंमत होत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
-
दरम्यान, संजय राऊतांमुळेच महाविकास आघाडीत फूट पडेल, अशी टीका भाजपाचे खासदर अनिल बोंडे यांनी केली होती. त्यालाही संजय राऊतांनी प्रत्त्युतर दिलं.
-
महाविकास आघाडीत फूट पडलेली नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे. खरं तर मी बोलतो, त्याची भाजपाच्या लोकांना पोटदुखी आहे. मुळात अनिल बोंडे यांना उत्तर द्यावं, इतके ते मोठे नाहीत, असं ते म्हणाले.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख