-
राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपा नेत्यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं वक्तव्य केलं.
-
यानंतर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी राधाकृष्ण विखेंना टोला लगावला आहे.
-
“तुम्हाला देवेंद्र फडणवीस तुमच्या मनातील मुख्यमंत्री वाटत असतील तर मग फडणवीसांच्या गळ्यात मंगळसुत्र बांधा,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.
-
संजय राऊत राधाकृष्ण विखेंविषयी नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा….
-
देवेंद्र फडणवीस भाजपा नेत्यांच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर त्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावर बसवावं. त्यांना कुणी थांबवलं आहे – संजय राऊत
-
तुमच्या मनात वेगळा आहे आणि तुम्ही दुसऱ्याबरोबरच नांदत आहात. हा व्यभिचार आहे – संजय राऊत
-
लग्न एकाबरोबर आणि दुसऱ्याबरोबर संसार करत आहेत. यासारखा व्यभिचार नाही – संजय राऊत
-
राधाकृष्ण विखे पाटील यांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसुत्र बांधावं – संजय राऊत
-
आम्ही कुठं आडवलं आहे. आम्हालाही ते चालेल – संजय राऊत
-
देवेंद्र फडणवीस म्हणतात की ते गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. मात्र, त्यांची नेमकी कोणती अडचण झाली आहे? – संजय राऊत
-
आज राज्याच्या मंत्रीमंडळातील भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार मोकळ आहेत. ते फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत – संजय राऊत
-
देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारी, घोटाळेबाज आणि गुंडांची टोळी चालवत आहेत का? – संजय राऊत
-
मी मुंबईला गेल्यावर गुलाबराव पाटलांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे उपमुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे – संजय राऊत
-
यापूर्वी दादा भूसे, राहुल कुल यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे त्यांना पाठवली होती – संजय राऊत
-
त्यांना यासंदर्भात १० वेळा पत्रही लिहिली. मग फडणवीस नेमके काय करत आहेत? कोणाला टोप्या लावत आहेत? – संजय राऊत
-
शिंदे सरकारच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे फडणवीसांना दिले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी याप्रकरणाची चौकशी करावी आणि आरोपींवर कारवाई करून दाखवावी – संजय राऊत

११ एप्रिल पंचांग: चतुर्दशी तिथीला वृषभ, धनूसह ‘या’ राशींवर राहील लक्ष्मीकृपा; तुमची भरभराट होणार का? वाचा शुक्रवारचे राशिभविष्य