-
अमृतपाल सिंगला २३ एप्रिल रोजी सकाळी सातच्या सुमारास पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पंजाबच्या मोगामधल्या रोड गावातल्या एका गुरुद्वारामध्ये तो लपून बसला होता.
-
या गावात अमृतपाल येणार याची खात्रीच गुप्तचर विभागाला होती. कारण ज्या भिंद्रनवालेंना अमृतपाल आपला आदर्श मानतो, त्यांचं हे मूळ गाव!
-
२२ एप्रिलची मध्यरात्र ते २३ एप्रिलची सकाळ या साधारणपणे सहा तासांच्या घडामोडी एखाद्या गुन्हेगारी कथानकावरील चित्रपटाला साजेसं ठरलं.
-
१८ मार्चला पंजाब पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अमृतपाल सिंगनं पोबारा केला होता. तेव्हापासून गेल्या ३६ दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते.
-
आधी अमृतपालनं शरणागती पत्करल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नंतर त्याच्याकडे पळून जाण्यासाठी मार्गच शिल्लक राहिला नसल्यामुळे परिणामी त्याला अटक झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
-
२२ एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरी एक फोन गेला. हा फोन गुप्तचर विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा होता.
-
अमृतपाल रोड गावातल्या गुरुद्वारामध्ये लपल्याची खात्रीशीर माहिती या अधिकाऱ्यानं मुख्यमंत्र्यांना दिली.
-
इथून पुढे सुरू झाल्या ‘ऑपरेशन अमृतपाल’च्या घडामोडी मुख्यमंत्री मान यांनी लागलीच पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांना फोन करून कारवाईचे आदेश दिले.
-
मात्र, हे करताना गुरुद्वाराचं पावित्र्य राखलं जाईल, याची खातरजमा करण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
-
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रमुखांना सांगितलं होतं की अशी कोणतीही घटना तिथे घडू नये ज्याचे परिणाम राज्याला दीर्घकाळ भोगावे लागतील.
-
अमृतपालला अटक करताना एकही गोळी न झाडण्याचे आदेश भगवंत मान यांनी दिले होते.पोलीस गुरुद्वारामध्ये प्रवेश करणार नाहीत, अशी ताकीदही त्यांनी दिली.
-
अमृतपाल सिंग रोड गावात असल्याचं समजल्यानंतर तातडीने सूत्र हलली. संपूर्ण गावाची नाकेबंदी करण्यात आली.
-
पोलीस फौजफाटा गावात गेल्यामुळे कोणतीही गडबड-गोंधळ होऊ नये. त्यासाठी सर्व पोलीस साध्या वेशात गावात पाठवण्याचे पोलिसांना आदेश होते.
-
अमृतपाल सिंगला अटक केल्यानंतर त्याचे राज्यभर काही वेगळे पडसाद उमटू शकतात का, याची खात्री आधीच घेण्यात आली होती.
-
पोलिसांनी संपूर्ण गावाची नाकेबंदी केल्यानंतर आणि गावभर पोलीस साध्या वेशात सज्ज झाल्यानंतरच रोडमधील त्या गुरुद्वारामध्ये अमृतपालला संदेश पाठवण्यात आला.
-
जेव्हा अमृतपाल सिंगला हे पटलं की आता हातपाय हलवून काहीही साध्य होणार नाही तेव्हा सकाळी ७ च्या सुमारास तो गुरुद्वाराबाहेर आला आणि त्याला पोलिसांनी अटक केली.
-
दरम्यान, अमृतपाल सिंग यानं गुरुद्वारातून बाहेर येण्याआधी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात तो शरणागती पत्करत असल्याचा दावा त्यानं केला होता. मात्र, नंतर त्याला अटकच केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
-
अमृतपाल सिंग फरार असताना गुरुद्वारांमध्ये आसरा घ्यायचा. त्यामुळे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या प्रमुख गुरुद्वारांवर नजर ठेवली. खासकरून रोडमधल्या गुरुद्वारावर!
-
१८ मार्चला त्याचा पाठलाग करताना त्याच्यावर जाणूनबुजून गोळीबार न करण्याचं पोलिसांचं धोरण होतं. त्यामुळे तो एकटा पडला आणि त्याच्याकडे गुरुद्वारामध्ये शरण घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं