-
अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते, पण आता ते श्रीमंतांच्या यादीपासून कोसो दूर गेले आहेत. मुकेश अंबानी यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानींना नशिबाने म्हणावी तशी साथ दिली नाही. (स्रोत: @tinambaniofficial/instagram)
-
रिपोर्ट्सनुसार, २००७ मध्ये अनिल अंबानी यांच्याकडे ४५ बिलियन डॉलर्सची संपत्ती होती. एवढेच नाही तर २००८ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते ६ व्या स्थानावर होते.(स्रोत: @tinambaniofficial/instagram)
-
अनिल अंबानी आणि भाऊ मुकेश अंबानी विभक्त झाल्यानंतर त्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलली. जेव्हा अनिल अंबानींची परिस्थिती बिकट झाली, तेव्हा एक दिवस आला, जेव्हा त्यांनी काही कंपन्यांचे कर्ज फेडण्यासाठी मालमत्ता विकण्यास सुरुवात केली. (स्रोत: @tinambaniofficial/instagram)
-
२००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात विभागला गेला होता. मुकेश अंबानी यांना पेट्रोकेमिकल, टेक्सटाईल आणि रिफायनरी, तर अनिल यांना टेलिकॉम, फायनान्स आणि एनर्जीचा व्यवसाय मिळाला. (स्रोत: @tinambaniofficial/instagram)
-
वाटणीच्या वेळी अनिल अंबानींची स्थिती मजबूत मानली जात होती, कारण त्यांच्याकडे नव्या काळातील व्यवसाय होता. मात्र असे असूनही ते यात विशेष काही करू शकले नाहीत आणि आज त्यांच्या कंपन्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागत आहे. (स्रोत: @tinambaniofficial/instagram)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१२ मध्ये अनिलची गुंतवणूक ७ बिलियन डॉलरपेक्षा जास्त होती. २०१९ मध्ये ते १.७ अब्ज डॉलर राहिले. (स्रोत: @tinambaniofficial/instagram)
-
लंडन न्यायालयाने दावा केला होता की, अनिल अंबानी यांच्याकडे दक्षिण मुंबईत ११ किंवा त्याहून अधिक आलिशान कार, एक खासगी जेट, एक नौका आणि एक विशेष सीविंड पेंटहाऊस आहे. (स्रोत: @tinambaniofficial/instagram)
-
मुकेश अंबानींबद्दल बोलायचे झाल्यास आज जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे ८५ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर अनिल अंबानी आज दिवाळखोरीत निघाले आहेत. (स्रोत: @tinambaniofficial/instagram)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ