-
सुदानमध्ये सध्या गृहसंघर्षामुळे यादवी माजली आहे, सुदानी सैन्य दल आणि निमलष्करी दल यांच्यातील संघर्षामुळे सुदानमधील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. ( Photo Courtesy – Reuters )
-
या संघर्षात ५०० पेक्षा जास्त नागरीकांचा मृत्यू झाला असून अनेक देशांचे नागरीक या संघर्षामुळे सुदानमध्ये अडकले आहेत. ( Photo Courtesy – Reuters )
-
तीन हजारपेक्षा जास्त भारतीय नागरीक हे सुदानमध्ये अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी आणि त्यांना देशात सुखरुप परत आणण्यासाठी भारताच्या परराष्ट्र खात्याने ‘ऑपरेशन कावेरी’ मोहीम राबवली आहे.
-
सुदानमध्ये गृहयुद्ध सुरु असतांना सुदानच्या बंदरापर्यंत ( Port Sudan ) पोहचण्याचे तिथल्या भारतीय नागरीकांपुढे एक मोठं आव्हान आहे.
-
सुदानच्या बंदरावर भारतीय नौदलाने INS Sumedha, INS Teg या युद्धनौका तैनात केल्या आहेत, या मोहमीत आणखी काही युद्धनौका दाखल होण्याची शक्यता आहे.
-
या युद्धनौकांमार्फत आता भारतीय नागरीकांना सौदी अरेबिया या देशातील Jeddah या बंदरापर्यंत आणलं जात आहे.
-
Jeddah बंदरातपर्यंत पोहचल्यावर त्यानंतर भारतीय नागरीकांना तिथल्या विमानतळावर नेले जात आहे.
-
Jeddah विमानतळावर भारतीय वायू दलाने विशेष मोहीमांकरता वापरली जाणारी C-130 हा विमाने तैनात केली आहे.
-
भारतीय वायू दलाच्या या विमानांमार्फत भारतीय नागरीकांना देशात आणलं जात आहे. ( For All Photo Courtesy – Indian Navy , Indian Air Force, Dr. S. Jaishankar, Indian External Affairs Ministry )

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”