-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.
-
याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात.
-
बुधवारी (२६ एप्रिल) हे दोघेही लोकमतच्या मंचावर आले आणि अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना थेट प्रश्न विचारले. यावर राज ठाकरे यांनीही परखड उत्तरं दिली. त्याचा हा आढावा.
-
राज ठाकरेंची आजही एकदम डॉनसारखी प्रतिमा आहे – अमृता फडणवीस
-
म्हणजे चांगल्या डॉनची प्रतिमा आहे.उद्योग क्षेत्र, चित्रपटसृष्टी असो किंवा राजकारणी असो, आजही राज ठाकरेंना घाबरतात – अमृता फडणवीस
-
ही प्रतिमा तुम्ही जाणूनबुजून तयार केली की तुमचं व्यक्तिमत्त्व, आंदोलनं, तुमच्यावरील दाखल गुन्हे यामुळे घाबरतात? – अमृता फडणवीस
-
प्रतिमा ही काही तयार केलेली गोष्ट नसते. तयार केलेली गोष्ट ही तात्पुरती असते – राज ठाकरे
-
मुळात मी तसा असेन. डॉन नाही, पण तसा मी ‘नो नॉनसेन्स’वाला माणूस आहे – राज ठाकरे
-
मी परखडपणे बोलत असेल, स्पष्टपणे बोलत असेन, पण उद्धटपणे बोलत नाही – राज ठाकरे
-
अनेकदा लोकांना स्पष्टपणा आणि उद्धटपणातील फरक कळत नाही. असं असलं तरी मी स्पष्टपणे बोलतो – राज ठाकरे
-
मला राग फार पटकन येतो. तो राग तितक्याच पटकन मावळतोही, पण राग येतो – राज ठाकरे
-
मला कित्येकदा आमच्या पक्षातील लोक म्हणतात की, जरा कमी स्पष्ट बोला – राज ठाकरे
-
यावर अमृता फडणवीसांनी तुम्ही स्पष्ट बोलता असं म्हणत राज ठाकरेंना पाच नेत्यांची नावं घेऊन त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? असं विचारलं.
-
अमृता फडणवीस – एकनाथ शिंदे, राज ठाकरे – जपून राहा
-
अमृता फडणवीस – देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे – वरती संबंध नीट ठेवा
-
अमृता फडणवीस – अजित पवार, राज ठाकरे – मला ५ तारखेच्या माझ्या रत्नागिरीतील सभेत सविस्तर बोलायचं आहे. एका वाक्यात बोलायचं नाही, पण अजित पवार बाहेर जेवढं लक्ष देत आहेत तेवढंच त्यांनी काकांकडेही लक्ष द्यावं.
-
अमृता फडणवीस – उद्धव ठाकरे, राज ठाकरे – उद्धव ठाकरेंना काय सांगणार मी, ते स्वयंभू आहेत.
-
अमृता फडणवीस – आदित्य ठाकरे, राज ठाकरे – तेच ते.
-
तुम्ही म्हणालात की देवेंद्र फडणवीसांनी जरा वर लक्ष दिलं पाहिजे, तसं त्यांनी घरीही लक्ष दिलं पाहिजे – अमृता फडणवीस
-
मला तुमच्या घरच्या प्रश्नांमध्ये आणू नका. मला जेव्हा तुम्ही मुलाखत घेणार हे समजलं… – राज ठाकरे
-
तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात फिरण्यासाठी, नातेसंबंध दृढ करण्यासाठी, सोबत देण्यासाठी वेळ असतो का? – अमृता फडणवीस
-
आपल्या घरातील जी परिस्थिती आहे ती प्रत्येक राजकारण्याच्या घरी असते – अमृता फडणवीस
-
देवेंद्र फडणवीस म्हणतात की, व्यग्र राजकारणी असेच असतात, म्हणून मी तुम्हाला विचारून हे तपासत आहे – अमृता फडणवीस
-
मी तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगेन की, देवेंद्र फडणवीस हे २०१४ मध्ये सत्तेत आले. ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर जबाबदारी असते – राज ठाकरे
-
आताही ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे गेल्या काही ७ ते ८ वर्षात ते तु्म्हाला वेळ देऊ शकले नसतील – राज ठाकरे
-
परंतु तुम्हाला त्यांनी आधी वेळ दिला आहे. तुमचे फोटो मी पाहिले आहेत – राज ठाकरे
-
पण मला ते भेटले तर मी नक्कीच याबद्दल त्यांच्याशी बोलेन. मी त्यांना काही ठिकाणंही सुचवेन – राज ठाकरे
-
धन्यवाद, त्यांना काही ऑफर असतील त्याही सांगा – अमृता फडणवीस
-
शर्मिला ठाकरे सक्रिय राजकारणात आल्या तर तुम्हाला चालेल का? – अमृता फडणवीस
-
मी घरचं काम करायला तयार आहे – राज ठाकरे
-
शर्मिला ठाकरे राजकारणात येऊन तुमच्या पुढे निघून गेल्या, तर तुम्हाला झेपेल का? – अमृता फडणवीस
-
हो, मला याची काहीच अडचण नाही. पण तुमच्या नंतर लक्षात येईल की राज ठाकरे परवडला – राज ठाकरे
-
आपल्याला परवडणारे लोकच नकोय – अमृता फडणवीस
-
कधी तुम्ही राष्ट्रवादीच्या जवळ दिसता… कधी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर दिसता… तर कधी भाजपाला टाळी देता – अमृता फडणवीस
-
तुमचं ‘कभी हा कभी ना’ हे नाटक खूप पाहिलंय. पण आता ‘हम साथ साथ है’ हे कुणाबरोबर आणि कधी करणार? – अमृता फडणवीस
-
तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी म्हणून मला हे विचारत नाहीत, त्यामुळे मी बोलूनच टाकतो – राज ठाकरे
-
सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) कुणाबरोबर आहेत? हेच कळत नाही – राज ठाकरे
-
कारण ते पहाटे गाडी घेऊन कुठेतरी जातात… हे कित्येकदा तुम्हालाही माहीत नसतं, मग ते कधीतरी शिंदेंबरोबर असतात – राज ठाकरे
-
तर कधी पहाटे अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो, अशा अनेक गोष्टी घडताना दिसतात – राज ठाकरे
-
कुणाला तरी भेटणं, ही प्रसारमाध्यमांसाठी बातमी झालीये – राज ठाकरे
-
राजकारणातील मोकळेपणा मीडियाने घालवला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही – राज ठाकरे
-
कुणी कुणाशी बोललं आणि कुणी कुणाला भेटलं तर लगेच युती किंवा आघाडी होत नसते – राज ठाकरे
-
जोपर्यंत याला मोठं स्वरुप येत नाही. तोपर्यंत त्यावर बोलण्याला काही अर्थ नाही – राज ठाकरे
-
सर्व छायाचित्र – संग्रहित
Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा