-
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी नुकतीच चिनाब पुलाची पाहणी केली आणि रेल्वेने केलेल्या कामाच्या दर्जाबद्दल कौतुक केले. त्यांच्याबरोबर रेल्वेचे काही वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
-
विशेष म्हणजे त्यांनी ट्विटरवर चिनाब पुलाच्या पाहणीचे फोटो शेअर केले आहेत आणि पुलाला “अद्भुत अभियांत्रिकीचा पराक्रम”, असे म्हटले आहे.
-
वर्षाच्या अखेरीस वंदे भारत ट्रेन (जम्मू-श्रीनगर वंदे भारत) थेट जम्मू ते श्रीनगर धावणार आहे.
-
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचे (USBRL) काम डिसेंबर २०२३ किंवा जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणार असल्याचंही रेल्वे मंत्र्यांनी सांगितलंय.
-
या प्रकल्पातील सर्वात कठीण काम म्हणजे चिनाब नदीवर रेल्वे पूल बांधणे.
-
खरं तर हा पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे आणि जगातील सर्वात उंच रेल्वे पूलदेखील आहे.
-
त्याची उंची सुमारे ३५९ मीटर आहे, तर आयफेल टॉवरची एकूण उंची ३३० मीटर आहे.
-
चिनाब पुलावर ट्रॅक बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे.
-
आता विद्युतीकरण आणि धडकविरोधी सुरक्षा उपकरण म्हणजेच कवच बसवण्याचे काम सुरू आहे.
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’