-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या आई मधुवंती ठाकरे यांची नुकताच एबीपी माझा या वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली.
-
यावेळी राज ठाकरे यांनी कुटुंबातील अनेक किस्से सांगितले. तसेच राज ठाकरे यांच्या आईंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यादरम्यान राज ठाकरे यांनी १०वीचा निकाल लागला त्या दिवशीचा एक प्रसंग सांगितला.
-
ते म्हणाले, “१०वीचा निकाल लागला तेव्हा बाळासाहेबांनी माझ्या आईला मी नापास झाल्याचं सांगितला. तेव्ही ती रडायला लागली”
-
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी त्यावेळी अंघोळ करत होतो. तेव्हा जयदेव यांनी मला आवाज दिला. मी दरवाजा उघडताच त्यांनी माझ्याकडे रागाने बघतिलं आणि तुला वरती बोलावलं आहे, असा निरोप दिला. त्यावेळी प्रचंड घाबरलो होतो. मात्र, वरती गेल्यावर बाळासाहेब माझ्याशी मस्करी करत होते, हे लक्षात आलं”
-
“मी १०वी पास झालो म्हणून बाळासाहेबांनी घरात कलर टीव्ही आणला होता. मी जर त्यावेळी बोर्डात पहिला आलो असतो, तर बाळासाहेबांनी काय केलं असतं याचा विचार न केलेलाच बरा”, असंही ते यावेळी म्हणाले.
-
राज ठाकरे यांनी जयदेव ठाकरे यांचेही बरेच किस्से सांगितलं. जयदेव ठाकरे हे कॉलेजमध्ये जाताना बरोबर साप घेऊन जात होते, असं ते म्हणाले.
-
पुढे बोलताना त्यांनी यासंदर्भातला एक प्रसंगही सांगितला. ते म्हणाले, “एके दिवशी एक गृहस्थ आमच्याकडे आले होते. त्यांना सापाची खूप भीती वाटायची. त्यावेळी जयदेव यांनी माझा सोन्या कुठंय असं म्हणत तुम्ही माझ्या सोन्यावर बसले आहात का? अशी विचारणा केली. खरं तर सोन्या हे जयदेव यांच्या अजगराचं नाव होतं. त्यानंतर ती व्यक्ती कधीही घरी आली नाही”, असं त्यांनी सांगितलं.
-
यावेळी राज ठाकरे यांनी मिताली आणि अमित ठाकरे यांच्या नात्याविषयी सुद्धा भाष्य केलं. “लग्नापूर्वी मिताली सतत आमच्या घरी यायची. त्यावेळी मी माझ्या पत्नीला याबाबत विचारलं. त्यानंतर आम्ही काश्मीरला गेलो, तेव्हा ती आमच्या बरोबर होती. तेव्हा मला त्यांच्या नात्याविषयी माहिती पडलं”. असं ते म्हणाले.
-
दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांनीही अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, “राज शाळेत असताना शुक्रवारी बाळासाहेब त्याला घ्यायला गाडी पाठवत होते. शनिवार आणि रविवार राज मातोश्रीवरच असायचा”
-
“राज ने शनिवारची शाळा कधी बघितलीच नाही. तेव्हा शनिवारी सकाळची शाळा असायची, बाळासाहेब म्हणायचे एवढ्या सकाळी कोणी शाळेत जातं का? मुळात तो लहान असताना बाळासाहेबांनी त्याचे अतोनात लाड केले”, असं त्यांनी सांगितला.
-
पुढे त्यांना उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आलं असता, त्यावेळी वाईट वाटलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. “उद्धवने राजीनाम्या द्यावा, अशी इच्छा नव्हती. त्याला लहानाचं मोठं होताना मी बघितलं आहे. त्यामुळे त्याला राजीनामा द्यावा लागला, त्यावेळी वाईट वाटलं”, असे त्या म्हणाल्या.
-
तसेच त्यांनी राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “राजने शिवसेना सोडली तेव्हा मला याची काहीही कल्पना नव्हती. कारण मी राजकारणाकडे जास्त लक्ष देत नाही. ज्या दिवशी राजने शिवसेना सोडली त्या दिवशी सकाळी मला यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर अनेकांचे फोन आले. मात्र, मला यासंदर्भात मला काहीच माहिती नाही, असं मी त्यांना सांगितलं”, असं त्यांनी सांगितलं.
वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी