-
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे देहू परिसरातील भंडारा डोंगर येथे भव्यदिव्य असे मंदिर बांधण्यात आहे.
-
हे मंदिर अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्रीरामाच्या मंदिरात प्रमाणेच आहे.
-
दोन्ही मंदिरांसाठी एकाच खाणीतील दगड वापरण्यात येत आहेत.
-
या मंदिर वास्तुशास्त्रदेखील एकच आहे. तसेच, कामगार, आर्किटेक्टदेखील एकाच ठिकाणचे आहेत.
-
तुकोबांचे मंदिर हे लोकवर्गणीतून उभा राहात असून २०२५ पर्यंत हे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती भंडारा डोंगरचे ट्रस्टी बाळासाहेब काशीद यांनी दिली.
-
विशेष म्हणजे गुजरातमधील अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारलं जात आहे. या मंदिरांची नेमकी वैशिष्टे काय आहेत? ती बघूया.
-
या मंदिराची लांबी १७९ फूट, उंची १०८ फूट तर रुंदी १९३ फूट इतकी भव्य आहे.
-
या मंदिराला तीन भव्य कळस असतील. हे कळस ८७ ते ९६ फुटांचे असतील.
-
या मंदिराच्या मंडपाची शोभा वाढवणारा घुमट हा ३४ फूट बाय ३४ फुटांचा असेल. तर गर्भगृह १३.५ फूट बाय १३.५ फूट इतका भव्य असेल.
-
मंदिराला नऊ दरवाजे तसेच गर्भगृहाला पाच दरवाजे आणि सहा खिडक्या असतील.
-
या मंदिरात मुख्य जागेवर विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची आणि त्यांना पाहण्यात मग्न असणारे संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल.
-
२५ हजार स्क्वेअर फुटांत १२२ खांबावर (पिलर) हे भव्य दिव्य मंदिर उभं राहणार आहे. यासाठी अंदाजे १५० कोटी रुपयांचा याला खर्च येणार आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”