-
महाराष्ट्रामध्ये भाजप रूजवण्यात आणि पक्षासाठी जनाधार निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण वाटा असणारे नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे.
-
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्हीही लेकी पंकजा आणि प्रीतम मुंडे या त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत.
-
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या कायमच त्यांच्या भाषणात वडील गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख करताना पाहायला मिळतात.
-
त्या नेहमीच वडिलांच्या आणि बालपणीच्या आठवणी ताज्या करताना दिसतात.
-
नुकतंच पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे या तिघींनी ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
-
यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या म्हणजे त्याच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.
-
या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी यशश्रीच्या धीटपणाबद्दल सांगितले.
-
तसेच त्यांनी प्रीतम मुंडे या राजकारणात कशा आल्या? याबद्दलही भाष्य केले.
-
“जेव्हा बाबा गेले तेव्हा मी फार खचले होते.”
-
“मी त्यावेळी अशी उद्धवस्त झाल्यासारखे होते. मला काय सुरु आहे, काहीच कळत नव्हते.”
-
“पण तेव्हा माझ्या बाबांच्या सर्व गोष्टी यशश्रीने केल्या.”
-
“त्यावेळी जे काही विधी वैगरे करावे लागले, ते सर्व तिने केले आहेत.”
-
“बाबांचे कपडे बदलणं वैगरे या गोष्टी तिनेच केल्या आहेत.”
-
“मी तिकडे थांबूच शकले नाही. मला चक्कर आली.”
-
“ती तिकडे एकटी उभी होती. तिला सर्वजण पाहत होते.”
-
“बाबा गेल्यानंतर जेव्हा आम्ही दौरा काढला.”
-
‘तेव्हा प्रत्येकजण छोटी कुठे?, बारकी मुलगी कुठे? असं विचारत होते.”
-
“त्यावेळी तीच लोकसभा लढेल, अशी प्रचंड चर्चा होती.”
-
“पण तिचं वय ६ महिन्यांनी कमी पडलं. २४ वर्ष ६ महिने असं तिचं वय होतं.”
-
“प्रीतम बिचारी राजकारणापासून फार दूर होती आणि ती राजकारणात आली, असं त्यावेळी घडलं आहे.” असे पंकजा मुंडेंनी सांगितले.
-
(सर्व फोटो – पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे/ फेसबुक)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”