-
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिल्यानंतर त्यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
-
आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
-
शुक्रवारी (१२ मे) ठाण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा.
-
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा आहे – राज ठाकरे
-
माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याप्रकरणी मला न्यायालय किंवा पोलिसांकडून नोटीस येतात. त्यातील त्यांची भाषा वाचल्यावर आपल्याला सोडलंय की अटक केली हेच कळत नाही. इतकी ती भाषा गुंतागुंतीची असते – राज ठाकरे
-
सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं सगळी प्रक्रिया चुकली, मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता – राज ठाकरे
-
विधिमंडळातील गट पक्ष समजला जाणार नाही, बाहेरचाच पक्ष म्हणून समजला जाईल. मग आता निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं काय होणार? – राज ठाकरे
-
या सगळ्यात निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे, सर्वोच्च न्यायालय ही एक यंत्रणा आहे – राज ठाकरे
-
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता निवडणूक आयोग काय करणार? म्हणून मी हा निकाल प्रचंड गोंधळात टाकणारा आहे, असं म्हटलं – राज ठाकरे
-
त्यामुळे ही सगळी धूळ खाली बसल्यावर आपल्या सर्वांना नक्की काय झालंय हे कळेल – राज ठाकरे
-
पत्रकारांनी राज ठाकरेंना तीन प्रश्न आणि त्यावर त्यांनी उत्तर देणं टाळत एका वाक्यात उत्तर दिलं.
-
दिल्लीत महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात उपोषण केलं आहे. त्यावर प्रश्न विचारला असता राज ठाकरे मला त्यावर बोलायचं नाही, असं म्हटले.
-
मनसे भाजपाशी युती करणार का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, काय संबंध. आम्ही युती करणार असू तर आधी तुला सांगू का?
-
एकनाथ शिंदेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे का? असा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे मला माहिती नाही असं म्हणाले.
-
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं असं निरीक्षणही नोंदवण्यात आलं. याबाबत पत्रकारांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी बोलणं टाळत मोजकी प्रतिक्रिया दिली.
-
ते म्हणाले की, मी आधी तेच बोललो. उद्धव ठाकरेंचे काय प्रश्न आहेत याच्याशी माझा काहीही संबंध नाही. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचं विचारलं म्हणून मी तेवढंच सांगितलं.
-
मला उद्धव ठाकरेंविषयीचे प्रश्न विचारू नका. तो वेगळा पक्ष आहे, माझा वेगळा पक्ष आहे. त्यांचे प्रश्न मला विचारून माझा वेळ वाया घालवू नका. परंतूला काहीही अर्थ नाही – राज ठाकरे
-
मुख्यमंत्र्यांना जपून राहा असा सल्ला दिला होता, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काय सांगाल? यावर राज ठाकरे म्हणाले की, कुठल्याही मुख्यमंत्र्याने जपूनच राहिलं पाहिजे.
-
आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाही. म्हणून आज ही सगळी परिस्थिती निर्माण झाली – राज ठाकरे
-
आपण कोणत्याही पदावर बसलेलो असलो तरी जपून राहिलं पाहिजे. प्रत्येकाला ते समजलं पाहिजे – राज ठाकरे
-
(सर्व छायाचित्र संग्रहित)

प्रसाद खरेदी करण्यास नकार देणाऱ्या भाविकांना मंदिरातील दुकानदारांची अमानुष मारहाण; महिलांनाही चामड्याच्या बेल्टने मारलं