-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (२० मे) नाशिक दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी संवाद साधला.
-
यावेळी त्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटपासून त्र्यंबकेश्वर धार्मिक तणाव, कर्नाटक निवडणूक, कोकणातील प्रकल्प, भाजपाने केलेली टीका, ईडी-सीबीआयचा वापर अशा अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याचा हा आढावा.
-
मी नोटबंदी झाली त्याचवेळी एक भाषण केलं होतं. हा धरसोड करण्याचा प्रकार आहे – राज ठाकरे
-
तज्ज्ञांना विचारून या गोष्टी झाल्या असत्या, तर ही वेळ आली नसती – राज ठाकरे
-
कधी एखादी गोष्ट आणायची, कधी बंद करायची. त्यावेळी नोटा आणल्या, तर त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही बघितलं नव्हतं – राज ठाकरे
-
हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात – राज ठाकरे
-
आता पुन्हा लोकांनी बँकेत पैसे टाकायचे. पुन्हा हे नव्या नोटा आणणार. हे असं सरकार चालत नाही. असे प्रयोग केले जात नाहीत – राज ठाकरे
-
नोटबंदी फसली का? या प्रश्नावर राज ठाकरे संतापले आणि म्हणाले की, मी या गोष्टी तेव्हाच बोललो होतो. मला जे प्रश्न विचारले जातात ते सरकारमधील लोक आल्यावर विचारले जात नाही. तेव्हा तोंड बंद असतं. मला हे प्रश्न विचारा म्हणून पत्रकारांना कुणी पाठवतं का?
-
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात वर्षानुवर्षे जी परंपरा सुरू आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही – राज ठाकरे
-
महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं-मशिदी आहेत कि जिथे वर्षानुवर्षे हिंदू-मुसलमान एकोपा आढळून येतो – राज ठाकरे
-
माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यावर उरूसावेळी तिथे जी चादर चढवली जाते ती माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल चढवतो – राज ठाकरे
-
इतर धर्माचा कुणी माणूस आपल्या धर्मात किंवा धर्मकार्यात आला तर लगेच धर्मभ्रष्ट व्हायला हिंदू हा इतका कमकुवत धर्म आहे का? मीही अनेक दर्ग्यामध्ये, मशिदीमध्ये गेलोय – राज ठाकरे
-
आपल्याच धर्मात फक्त काही जातीनांच गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. असले वाद घालणारी लोकं कोत्या मनोवृत्तीची आहेत – राज ठाकरे
-
त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी त्या वादावर बोलावं. बाहेरच्यांनी यात काही पडायची गरज नाही. यात कुणाला दंगली घडवायच्या आहेत का? – राज ठाकरे
-
ज्या गोष्टी चुकीच्या त्या चुकीच्याच. म्हणून मी त्रास देणाऱ्या मशिदींवरच्या भोंग्यांवर बोललो. माहीम समुद्रातील मजारीवर बोललो – राज ठाकरे
-
गडकिल्ल्यांवर पण काही ठिकाणी अनधिकृत दर्गे उभे राहतात तेही हटवलेच पाहिजेत. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यावर तुम्ही प्रहार केलाच पाहिजेत. पण जाणून बुजून दंगली घडवायला काहीतरी खोदून काढायचं हे योग्य नाही – राज ठाकरे
-
आतापर्यंतचा महाराष्ट्रात जिथे मराठी मुसलमान राहतात तिथे कधी दंगली होत नाहीत, कारण ते पिढानपिढ्या ते महाराष्ट्रात राहतात, मराठीत बोलतात. अशा ठिकाणांमध्ये जे सामंजस्य आहे ते विनाकारण बिघडवू नका – राज ठाकरे
-
बहुसंख्य हिंदू असलेल्या देशामध्ये जर ‘हिंदू खतरे में है’ असं म्हटलं तर कसं होईल? निवडणुका जवळ आल्या की हा धार्मिक उन्माद वाढत जाईल – राज ठाकरे
-
कोकणात हजारो एकर जमिनी कोकणवासियांना फसवून विकत घेतल्या जात आहेत. दलाल, अधिकारी यांच्या संगनमताने जमिनी गिळल्या जात आहेत – राज ठाकरे
-
जैतापूरचा प्रकल्पाचं काय झालं? काहीच नाही. ती कंपनी बुडाली. तिथे जमीन विकत घेतलेली आहेच मग तिथे का नाही नेत तो प्रकल्प? – राज ठाकरे
-
कोकणी भूमिपुत्राकडून दलालांनी, धनदांगडग्यांनी जमिनी जिथे विकत घेतल्या आहेत तिथे प्रकल्प नेतात आणि मग सरकारकडून हजार पटीने भाव काढून घेतात. मग प्रकल्प झाला काय आणि नाही झाला काय यांना काहीच फरक पडत नाही – राज ठाकरे
-
मी कर्नाटकच्या निकालावर प्रतिक्रिया दिली तर भाजपा म्हणतं, “आमच्याबाबतीत कुणीही बोलू नये.” म्हणजे हे कशाच्याही बाबतीत बोलणार पण यांच्याबाबतीत कुणी बोलायचं नाही. हा कोणता उद्दामपणा? – राज ठाकरे
-
देशात ईडी-काड्यांचे व्यवहार फार सुरू आहेत. एक लक्षात ठेवा कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही – राज ठाकरे
-
उद्या दुसरं सरकार येईल, तेव्हा ते दामदुपटीने बदला घेतील म्हणून सत्ताधाऱ्यांनी चुकीचे पायंडे पाडू नयेत – राज ठाकरे (सर्व छायाचित्र संग्रहित)

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश