-
ओडिशा राज्यात शुक्रवारी(२ जून) रात्री झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघताने खळबळ माजली आहे.
-
ओडिशामधील बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनजवळ तीन रेल्वेंचा विचित्र अपघात झाला.
-
या अपघातात २३९ जणांनी जीव गमावला आहे. तर, ९०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
-
हा अपघात इतका भीषण होता की मदत आणि बचावकार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाला गॅस कटरच्या मदतीने मृतदेह काढावे लागत आहेत.
-
या भीषण अपघातात जीव गमावलेल्या एका प्रवाशाच्या आईशी एएनआयने संपर्क साधला.
-
पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात राहणाऱ्या एका २६ वर्षीय प्रवाशाचा ओडिशामधील रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे.
-
त्याच्या मृत्यूनंतर आईने आक्रोश केला आहे.
-
एएनआयशी बोलताना त्या म्हणाला, “बालासोर ट्रेन अपघातात माझ्या मुलाचा मृत्यू झाला. तो चेन्नईला जात होता.”
-
“माझा मुलगा २६ वर्षांचा होता. त्याला दोन मुलं आहेत”, असं म्हणत त्यांनी आक्रोश केला आहे.
-
शुक्रवारी रात्री कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक १२८४१ चे कोच बी २ ते बी ९ हे डबे रुळावरुन घसरले. त्यानंतर बी १ हा कोच आणि इंजिनही रुळावरुन घसरलं.
-
त्यानंतर मालगाडीची टक्कर झाली. जे लोक एसी बोगीमध्ये बसले होते त्या प्रवाशांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाला आहे, असं रेल्वेच्या प्रेस रिलिजमध्ये म्हटलं आहे.
-
हावडा मेलची ही टक्कर याच दरम्यान झाली.
-
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे मंत्रालयाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफ आणि लष्कर अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
-
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
-
पॅसेंजर ट्रेनचे डबे रुळावरून घसरण्याचे कारण तपासण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
-
(सर्व फोटो : ANI)

Ajit Pawar : पार्थदादा जय पवारांपेक्षाही मोठे, त्यांचं लग्न कधी? पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं मिश्किल उत्तर, म्हणाले…