-
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत काल (२ जून) ऑन कॅमेरा थुंकले होते. यानंतर आता शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट वाद पुन्हा पेटला आहे.
-
अजित पवारांनी सुद्धा “संजय राऊतांनी किंवा कुणीही बोलताना संयम राखला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया देत या प्रकरणावर भाष्य केले होते.
-
आज अजित पवारांवर पलटवार करत राऊतांनी “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं” असे सडेतोड उत्तर दिले होते
-
आता या सगळ्या वादात पुण्यातील गुडलक चौकात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चाच काढला आहे
-
शिंदे गटाचे कार्यकर्ते हातात संजय राऊतांचे बॅनर घेऊन चौकात उतरले होते. यावेळी फोटोवर संजय राऊतांचा फोटो लावलेला होता.
-
काळ्या चिकटपट्टीने संजय राऊतांच्या चेहऱ्यावर ‘X’ काढून काही बॅनर या कार्यकर्त्यांनी हातात धरले होते.
-
गाढव व रेड्याच्या फोटोवर संजय राऊतांचा चेहरा लावून शिंदे गटाचे कार्यकर्ते यावर थुंकले होते.
-
काही बॅनर्सवर ‘संज्या ओढतो गांजा’, ‘धिक्कार असो’ अशी वाक्ये लिहिलेली होती.
-
तर मोर्चात सहभागी महिला कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या फोटोवर चप्पल मारली आहे.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स