-
ओडिशातील रेल्वे अपघातानंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनजवळ तीन रेल्वेत झालेल्या विचित्र अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे.
-
तर, ९०० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
-
या घटनेवर तीन माजी रेल्वेमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेला निष्काळजीपणा म्हटलं आहे. तर, राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, भाजपा नेते दिनेश त्रिवेदी यांनी घातपातची शक्यता वर्तवली आहे.
-
ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, “ओडिशातील बालासोर येथे झालेला रेल्वेचा अपघात सर्वात मोठा आहे. अपघाताचं कारण तपासण्याची आवश्यकता आहे.”
-
“या अपघातामागील सत्य बाहेर आलंच पाहिजे. रेल्वे अपघात यंत्रणा काम का करत नाही?,” असा सवालही ममता बॅनर्जींनी विचारला. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पश्चिम बंगालमधील प्रवाशांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली.
-
या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.
-
“दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,” असेही लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं.
-
“ही घटना एक कट असू शकते. या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे. या घटनेची वेळ विचित्र आहे. रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होऊन, विश्लेषण व्हायला हवं,” अशी मागणी दिनेश त्रिवेदी यांनी केली आहे.
-
“भूकंपानंतर जे चित्र असतं, तसं रेल्वेच्या अपघातानंतर झालं आहे. जपानसारखं रेल्वे अपघातात एकही मृत्यू होऊ नये, हाच आपला उद्देश असावा. नवीन तंत्रज्ञानाचा रेल्वेत समावेश केला जात आहे,” असेही त्रिवेदी यांनी सांगितलं.

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल