-
केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी (५ जून) महिला हक्क कार्यकर्ती रेहाना फातिमाची पॉक्सो कायद्यानुसार दाखल गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.
-
फातिमाने स्त्री आणि पुरुषाच्या शरीराकडे बघण्याच्या समाजातील दुटप्पीपणाला आव्हान दिलं.
-
तसेच स्त्री-पुरुष शरीराकडे समान दृष्टीकोनातून बघावं, यासाठी स्वतःच्या अर्धनग्न शरीरावर आपल्याच मुलांना चित्र काढायला लावलं.
-
या कृतीनंतर रेहाना फातिमावर मुलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप झाला आणि बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा, बाल न्याय आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
-
मात्र, आता या प्रकरणात केरळ उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांच्या खंडपीठाने फातिमा यांची निर्दोष मुक्तता केली.
-
हा निकाल देताना केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वाची निरिक्षणं मांडली. न्यायालयाने नेमकं काय म्हटलं याचा हा आढावा…
-
समाजात स्त्रियांचा स्वतःच्या शरीरावरील अधिकार मान्य केला जात नाही – केरळ उच्च न्यायालय
-
त्यांना छळणूक, भेदभाव आणि शिक्षेचा सामना करावा लागतो आणि त्यांना स्वतःच्या शरीराबद्दल, जीवनाबद्दल निर्णय घेण्यापासून रोखले जाते – केरळ उच्च न्यायालय
-
व्हिडीओवरून रेहाना फातिमाने तिच्या मुलांचा लैंगिक समाधानासाठी वापर केलेला दिसत नाही – केरळ उच्च न्यायालय
-
फातिमाने तिच्या शरीराचा वापर मुलांना फक्त पेंटिंगसाठी ‘कॅनव्हास’ म्हणून करून दिला आहे – केरळ उच्च न्यायालय
-
महिलांना त्यांच्या शरीराबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे – केरळ उच्च न्यायालय
-
हा त्यांच्या समानता आणि गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराचा गाभा आहे – केरळ उच्च न्यायालय
-
संविधानाच्या अनुच्छेद २१ मध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याचाही समावेश होतो – केरळ उच्च न्यायालय
-
शरीराच्या वरच्या नग्नभागाला लैंगिक कृत्य म्हणून पाहिले जाऊ शकत नाही – केरळ उच्च न्यायालय
-
शरीरावरील पेंटिंग लैंगिक तृप्तीसाठी किंवा लैंगिक समाधानाच्या उद्देशाने काढले असे म्हणता येणार नाही – केरळ उच्च न्यायालय
-
अर्धनग्न चित्रकलेचा संबंध लैंगिक समाधानाशी जोडणे चुकीचे आणि क्रूर आहे – केरळ उच्च न्यायालय
-
या प्रकरणात मुलांचा पोर्नोग्राफीसाठी वापर झाला आहे, हे सिद्ध करण्यासाठी कोणताही आधार नाही – केरळ उच्च न्यायालय
-
व्हिडीओमध्ये लैंगिक समाधानाचे कोणतेही संकेत नाहीत – केरळ उच्च न्यायालय
-
शरीराच्या वरच्या भागाचे चित्रण करणे, मग ते पुरुष असो किंवा स्त्री, लैंगिक समाधानाशी जोडले जाऊ शकत नाही – केरळ उच्च न्यायालय
-
नग्नता आणि अश्लीलता नेहमीच समानार्थी नसतात – केरळ उच्च न्यायालय
-
एकेकाळी केरळमधील खालच्या जातीतील महिलांनी त्यांचे स्तन झाकण्याच्या अधिकारासाठी लढा द्यावा लागला होता – केरळ उच्च न्यायालय
-
देशभरातील विविध प्राचीन मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी देवीदेवतांचे अर्धनग्न चित्रे, शिल्पे आणि मूर्ती आहेत – केरळ उच्च न्यायालय
-
असं असूनही ही शिल्पे आणि मूर्ती अनेक राज्यांत ‘पवित्र’ आणि पूजनीय मानल्या जातात – केरळ उच्च न्यायालय
-
नग्न मूर्तीसमोर भक्त प्रार्थना करत असतो तेव्हा त्याच्या मनात लैंगिक भावना नसते, तर देवत्वाची भावना असते – केरळ उच्च न्यायालय
-
केरळमध्ये पुलीकाली उत्सवात पुरुषांच्या शरीरावरील पेटिंगच्या प्रथेला लोकमान्यता आहे – केरळ उच्च न्यायालय
-
थेय्यम आणि इतर प्रथांमध्ये तर मंदिरात पुरुषांच्या शरीरावर चित्रे काढली जातात – केरळ उच्च न्यायालय
-
पुरुषांचे शरीर सिक्स पॅक अॅब्ज स्वरुपात दाखवले जाते – केरळ उच्च न्यायालय
-
आपण आपल्या आजूबाजूला पुरुष शर्ट न घालताच फिरत असल्याचं नियमितपणे पाहतो – केरळ उच्च न्यायालय
-
मात्र पुरुषांची ही अर्धनग्नता कधीही अश्लील मानली जात नाही किंवा ती लैंगिक समाधानाशी जोडली जात नाही – केरळ उच्च न्यायालय
-
एकीकडे पुरुषाचे अर्धनग्न शरीर सामान्य मानलं जात असताना दुसरीकडे स्त्रीच्या शरीराबाबत असा समान विचार केला जात नाही – केरळ उच्च न्यायालय
-
काही लोक तर स्त्रीच्या नग्न शरीराकडे केवळ त्यांच्या लैंगिक इच्छापूर्तीचं साधन म्हणून पाहतात – केरळ उच्च न्यायालय
-
स्त्रीचं नग्न शरीर केवळ लैंगिक उपभोगासाठी असल्याच्या दृष्टीकोनामुळे नग्नता हा चर्चा न होणारा विषय झाला आहे – केरळ उच्च न्यायालय
-
याचिकाकर्त्या रेहाना फातिमा यांनी मुलं शरीरावर पेटिंग काढतानाचा व्हिडीओ शेअर करताना त्याचा हेतू स्त्री-पुरुषाच्या शरीराबाबत समाजात असलेला दुटप्पीपणा उघड करणे हा असल्याचं स्पष्ट केलं आहे – केरळ उच्च न्यायालय (सर्व छायाचित्र – रेहाना फातिमा फेसबूक)
१५ मार्च पंचांग: बुधाचे राशी परिवर्तन १२ राशींसाठी शुभ ठरेल की अशुभ? तुमच्या आयुष्यात काय बदलणार? वाचा राशिभविष्य