-
मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात सावित्रीबाई फुले वसतिगृहात १८ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली.
-
गंभीर म्हणजे पीडित तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला आहे. त्यामुळे पीडित तरुणीची बलात्कार करून हत्या झाल्याचा संशय आहे.
-
वसतिगृहातील सुरक्षा रक्षकानेच हे कृत्य केल्याचा आरोप आहे.
-
आरोपीने या कृत्यानंतर चर्नी रोड स्थानकाजवळ रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.
-
या संतप्त घटनेप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मरीन लाईन पोलीस स्टेशनला जाऊन माहिती घेतली.
-
तसेच पीडितेच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. यानंतर अजित पवारांनी माध्यमांना माहिती दिली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
आरोपीला वसतिगृहातील अनेक मुली काही ना काही कामानिमित्त फोन करायच्या – अजित पवार
-
कदाचित आरोपीने वसतिगृहातील मुलींचा विश्वास संपादन केला असेल – अजित पवार
-
फोनमधील नंबरवरून आरोपीचं वेगवेगळ्या मुलींशी संभाषण झाल्याचं दिसत आहे. मात्र, काय संभाषण झालं आहे हे अद्याप समजलेलं नाही – अजित पवार
-
मी पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे करण्यास सांगितलं आहे – अजित पवार
-
आई-वडिलांनाही शंका आहे की, आमच्या मुलीला एकटीला चौथ्या मजल्यावर का ठेवलं? – अजित पवार
-
रोज वडिलांना फोन करणाऱ्या या मुलीने ८ जून रोजी पुन्हा गावाकडे जाण्यासाठी तिकीट बूक केलं होतं – अजित पवार
-
कारण ५ जून रोजी तिच्या परीक्षा संपणार होत्या. ती दोन दिवस थांबून ८ जूनला परत गावाकडे जाणार होती. अशा सगळ्या घटना घडल्या होत्या – अजित पवार
-
ही घटना सरकारला कमीपणा आणणारी आहे. कारण घटना घडली तो रस्ता महत्त्वाचा रहदारीचा रस्ता आहे – अजित पवार
-
त्याच रस्त्यावरून व्हीव्हीआयपी लोकांचं सारखं जाणं आहे – अजित पवार
-
राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्याच रस्त्याने जातात, पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारीही याच रस्त्यावरून जातात – अजित पवार
-
रस्त्याच्या एका बाजूला मत्सालय आहे – अजित पवार
-
एका बाजूला शिक्षण विभागाची इमारत आहे, तर एका बाजूला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठी भाषा भवनाचं उद्घाटन केलेलं ठिकाण आहे – अजित पवार
-
तसेच मागच्या बाजूला रेल्वेमार्ग आहे. असा हा परिसर आहे – अजित पवार
-
म्हणजे घटना घडली तो परिसर अडगळीत नाही किंवा लांबच्या भागात नाही – अजित पवार
-
त्यामुळे त्याचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे. त्या निष्पाप मुलीला न्याय मिळाला पाहिजे. तिच्या आई-वडिलांना न्याय मिळाला पाहिजे – अजित पवार
-
मुंबईतील चर्चगेट भागात सावित्रीबाई फुले वसतिगृहात त्या तरुणीबाबत दुर्दैवी घटना घडली. यानंतर तिचे आई-वडील, भाऊ गावाहून मुंबईत आले – अजित पवार
-
या आई-वडिलांना जुळा मुलगा-मुलगी झाले होते. दोघेही दहावीपर्यंत अभ्यासात हुशार म्हणून ओळखले जात होते – अजित पवार
-
दहावीनंतर मुलाने पुण्यात आयटीआय करण्यासाठी प्रवेश घेतला. मुलगी मुंबईत शिक्षणासाठी आली होती – अजित पवार
-
मी दुपारी जी शंका उपस्थित केली होती ती खरी ठरली – अजित पवार
-
सावित्रीबाई फुले वसतिगृहात ४५० मुलींची व्यवस्था आहे. असं असताना तिथं केवळ १० टक्के मुलीच तिथं राहतात – अजित पवार
-
विशेष म्हणजे पीडित तरुणी एकटीच चौथ्या मजल्यावरील एका रुममध्ये राहत होती – अजित पवार
-
एवढं मोठं वसतिगृह असल्याने सर्व मुलींना एकाच मजल्यावर ठेवता आलं असतं. तसं का केलं नाही? – अजित पवार
-
याबाबत पोलिसांनी वसतिगृहाच्या रेक्टरांना विविध प्रश्न विचारले आहेत – अजित पवार
-
सीसीटीव्हीत कोण बाहेर पडलं हेही तपासण्यात आलं – अजित पवार
-
पहाटे चार-पाच वाजल्याच्या दरम्यान ज्याने दुष्कृत्य केलं तो व्यक्ती वसतिगृहातून बाहेर पडला – अजित पवार
-
यानंतर रेल्वे रुळावर जाऊन त्याने आत्महत्या केली. त्यामुळे तोही पुरावा राहिलेला नाही – अजित पवार
-
त्यामुळे यात आणखी काही शक्यता आहेत का हेही तपासलं जात आहे – अजित पवार
-
मी आणि अमोल मिटकर दोघांनी पोलिसांना सांगितलं आहे की, पीडिता आणि आरोपी दोघांचे फोन पोलिसांकडे आहेत – अजित पवार
-
त्यामुळे पोलिसांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते कोणाशी बोलत होते, काय बोलले, किती वेळ बोलले हे तपासावं – अजित पवार
-
कारण आरोपीला या वसतिगृहात सरकारने नेमलेलं नव्हतं, तरी तो वसतिगृहात राहत होता – अजित पवार

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य