-
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ६ जूनला हिंदुत्ववादी संघटनांनी भगवा मोर्चा काढला.
-
यानंतर मोर्चातील लोक घरी जात असतानाच काही समाजकंटकांनी संगमनेरमधील समनापूर गावात दगडफेक केली.
-
या दगडफेकीत अनेक गाड्यांची तोडफोड झाली.
-
याशिवाय समाजकंटकांनी मारहाणीचाही प्रकार केला.
-
या घटनेनंतर समनापूरमध्ये दोन समाजात धार्मिक तणाव निर्माण झाला.
-
यानंतर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलिसांची तैनाती केली.
-
यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
-
या घटनेवर आपल्या खास शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या समनापूरमधील प्रसिद्ध वडापाववाले अन्सार चाचा यांनी प्रतिक्रिया दिली.
-
तसेच तोडफोड, दगडफेक करणारे कोण आहेत हे सांगितलं. त्याचा हा आढावा. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
-
खूप चांगलं राहिलं पाहिजे. प्रचंड प्रेमाने राहिलं पाहिजे. महाप्रचंड प्रेमाने राहिलं पाहिजे – अन्सार चाचा
-
भाडणं करून, दगडफेक करून काहीही साध्य होणार नाही – अन्सार चाचा
-
ते आपल्या देशाचंच नुकसान आहे, हे विसरून चालणार नाही – अन्सार चाचा
-
सगळी माणसं गुण्यागोविंदाने, प्रचंड प्रेमाने राहिले तर अशा भानगडी उद्धवणार नाही – अन्सार चाचा
-
त्यामुळे माझं प्रत्येक गाववाल्याला सांगणं आहे की, कोणतंही भांडण करू नका – अन्सार चाचा
-
लोकांनी प्रचंड प्रेमाने रहावं हीच अपेक्षा आहे – अन्सार चाचा
-
आजचं भांडण आमच्या गावातील एकाही माणसाने केलेलं नाही – अन्सार चाचा
-
रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी हे भांडण केलं – अन्सार चाचा
-
पोलिसांकडे भांडणं करणाऱ्यांचे फोटो आले आहेत. ते पुढील कारवाई करणार आहेत – अन्सार चाचा
-
माझी हात जोडून लोकांना प्रचंड प्रेमाने विनंती आहे की, मायबाप भांडणं करू नका – अन्सार चाचा
-
महाप्रचंड वेगाने शांत व्हा. चांगल्याप्रकारे रहा हीच अपेक्षा आहे – अन्सार चाचा
-
सर्व छायाचित्र – आरएनओ व संग्रहित

असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! हायवेवर ओव्हरटेक करायला गेला अन् क्षणार्धात झाला कारचा चुरा, थरारक VIDEO व्हायरल