-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णयाची घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
-
यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
-
यावर शरद पवार यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
-
शरद पवार म्हणाले, “अजित पवार यांच्याबद्दल सुरु असलेल्या वृत्तांमध्ये १ टक्केही सत्य नाही.”
-
“नव्या निवडीनंतर दोन लोक नाराज असल्याचं वृत्त चालवलं जात आहे.”
-
“यातील एक म्हणजे जयंत पाटील… महाराष्ट्र राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडं आहे. तर, अजित पवारांकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.
-
“प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेंची यांच्याकडं कोणतीही जबाबदारी नाही. वेळ देण्याची तयारी असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली.”
-
“नाराजीच्या चर्चा चुकीच्या आहेत. आज करण्यात आलेल्या नियुक्तींबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर मागील एक महिन्यांपासून चर्चा सुरू होती.”
-
“त्यावर आज निर्णय घेण्यात आला,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”