-
ठाण्यात भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) युतीत असलेला वाद चव्हाट्यावर आला.
-
दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसले.
-
खासदार श्रीकांत शिंदेंनी तर राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.
-
अशातच आता भाजपा नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला.
-
तसेच एका अधिकाऱ्यामुळे युतीत तणाव निर्माण झाल्याचं सांगत तो अधिकारी आकाशातून पडला आहे का? असा प्रश्न विचारला.
-
ते शनिवारी (१० जून) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
पोलिसांवर शिंदे गटाचाच दबाव असणं स्वाभाविक आहे- नरेंद्र पवार
-
शेवटी मुख्यमंत्री स्थानिक आहेत. मुख्यमंत्र्यांचा थोडासा दबाव असतोच- नरेंद्र पवार
-
मुख्यमंत्र्यांना थोडं झुकतं माप असतंच. त्यामुळे गृहमंत्री आमचे असले, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वरचष्मा दिसतो आहे- नरेंद्र पवार
-
म्हणून तर ही नाराजी व्यक्त झाली. ही नाराजी निश्चितपणे दूर होईल याची आम्हाला खात्री आहे- नरेंद्र पवार
-
हा खरं भाजपा कार्यकर्त्यांचा रोष आहे. त्यांनी त्या दिवशी त्यांची भावना व्यक्त केली- नरेंद्र पवार
-
ती या विषयावरची बैठक नव्हती. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ९ वर्षे पूर्ण झाले. त्याअनुषंगाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात कॅबिनेट मंत्री स्वतः बैठका घेत आहेत- नरेंद्र पवार
-
श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यात रवी चव्हाण यांचं योगदान काय आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनाही माहिती आहे- नरेंद्र पवार
-
त्या दिवशी कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे विषय मांडला. त्यामुळे रवी चव्हाण आणि आमचा नाईलाज झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांची भावना ऐकून घेणं गरजेचं होतं- नरेंद्र पवार
-
त्याच भावनेतून कार्यकर्त्यांनी ठराव केला की, जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणतंही सहकार्य करणार नाही – नरेंद्र पवार
-
सध्या त्या अधिकाऱ्यावर जुजबी कारवाई केली आहे. त्या अधिकाऱ्याची बदली केली पाहिजे- नरेंद्र पवार
-
त्याला इथं ठेवण्याची काय गरज आहे. तो अधिकारी इतका मोठा आहे का, आकाशातून पडला आहे का- नरेंद्र पवार
-
त्याला यांनी केवळ सक्तीच्या रजेवर पाठवलं. त्याची बदली केली पाहिजे. मात्र, ते भाजपा कार्यकर्त्यांच्या जखमेवर आणखी मिठ चोळत आहेत- नरेंद्र पवार
-
त्या अधिकाऱ्यासाठी युतीतील वातावरण गढूळ होत आहे. त्यावर उपाययोजना करून त्या अधिकाऱ्याची बदली केली पाहिजे- नरेंद्र पवार
-
मी स्वतः जिल्हाध्यक्षांशी बोललो आहे. हा जाहीर बैठकीचा विषय नाही- नरेंद्र पवार
-
त्या दिवशी अनपेक्षितपणे ठराव आला आणि पारित केला गेला. मात्र, ती कार्यकर्त्यांची भावना होती- नरेंद्र पवार
-
आम्ही ठरवलं आहे की आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वेळ घेऊ, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेऊ- नरेंद्र पवार
-
त्यांच्यासमोर हा विषय मांडू. त्यांनी यावर आम्हाला न्याय द्यावा अशी आमची सर्वांची भावना आहे- नरेंद्र पवार
-
सर्व छायाचित्र – नरेंद्र पवार यांच्या फेसबूक पेजवरून

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल