-
खारघरमध्ये १६ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या शासकीय सोहळ्यात श्री-सदस्यांचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू होण्यासाठी सरकारी यंत्रणाच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप ॲड. असीम सरोदे यांनी केला.
-
याप्रकरणात त्यांनी शनिवारी (१७ जून) पनवेल येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश सुशीला पाटील यांच्या न्यायालयात युक्तिवाद केला.
-
तसेच खारघरमधील या चेंगराचेंगरीतील मृत्यूप्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावी, अशी मागणी केली.
-
ते महाराष्ट्र आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांच्या याचिकेवर युक्तिवाद करत होते. यावेळी त्यांनी काय आरोप आणि मागण्या केल्या त्याचा हा आढावा…
-
१८ एप्रिल २०२३ रोजी खारघर दुर्घटनेबाबत आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी लेखी तक्रार खारघर पोलीस स्टेशनला दाखल केली होती – धनंजय शिंदे
-
या संदर्भात खारघर पोलीस स्टेशनला स्मरणपत्रे देऊनही काहीच कृती करण्यात आली नाही. त्यामुळे आपने २४ एप्रिलला नवी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून लेखी स्मरणपत्र दिले – धनंजय शिंदे
-
त्यानंतरही काहीच कृती न झाल्याने अखेर नाईलाजास्तव पनवेल कोर्टात धाव घ्यावी लागली – धनंजय शिंदे
-
या तक्रार अर्जात मुख्य सचिव, सांस्कृतिक विभाग, खारघर पोलीस ठाणे, परिमंडल – २ पनवेल, तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे – धनंजय शिंदे
-
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आजपर्यंत राजभवनात निमंत्रित लोकांच्या उपस्थितीत व्हायचा. परंतु श्री-सेवकांच्या माध्यमातून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हा कार्यक्रम जाहीर व भव्य स्वरूपात घेण्यात आला – ॲड. असीम सरोदे
-
सरकारने या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी यावे यासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली, होर्डिंग्ज लावले, जाहिराती दिल्या. मग मंडप व्यवस्था का केली नाही? – ॲड. असीम सरोदे
-
कार्यक्रमाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची-जेवणाची व प्रथमोपचाराची सोय का केली नाही? – ॲड. असीम सरोदे
-
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लिहिले की, हा कार्यक्रम भव्य होणार, अलोट गर्दी जमणार, मग लोकांसाठी अन्न, पाणी व प्राथमिक सुविधा का पुरवण्यात आल्या नाहीत? – ॲड. असीम सरोदे
-
जाणूनबुजून दाखविलेला हा बेजबाबदारपणा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. कारण कार्यक्रमासाठी जनतेच्या निधीतून तब्बल १३ कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली – ॲड. असीम सरोदे
-
पोलिसांनी तक्रारदार धनंजय शिंदे यांना लेखी कळवले आहे की, १४ जणांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले – ॲड. असीम सरोदे
-
काहीही झाले तरीही शवविच्छेदन अहवालात उष्माघाताने मृत्यू असे नमूद केलेच जाऊ शकत नाही – ॲड. असीम सरोदे
-
उष्माघाताने मृत्यू झाले असतील, तरीही मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज, हृदयक्रिया बंद पडणे, मल्टिपल ऑर्गन फेलिअर असे असू शकते – ॲड. असीम सरोदे
-
सरकारला पाहिजे तसे अहवाल तयार करण्यात आल्याने श्री-भक्तांचे मृत्यू चेंगराचेंगरीत झाले नाहीत, तर केवळ उष्माघाताने झालेत असे दाखवण्यासाठी उष्माघात असा उल्लेख मुद्दाम केला आहे – ॲड. असीम सरोदे
-
धनंजय शिंदे यांनी व्यापक जनहितासाठी ही खासगी तक्रार कोर्टात केली आहे. या तक्रारीत सगळे सरकारी कर्मचारी दोषी आहेत – ॲड. असीम सरोदे
-
सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयीन कामाच्या जबाबदाऱ्या पार न पाडल्याने त्यांच्याविरुद्ध चौकशी आदेश देण्यासाठी न्यायालयाला सरकारच्या पूर्व-परवानगीची गरज नाही – ॲड. असीम सरोदे
-
तसेच न्यायालयाने सध्या केवळ ‘घटनेच्या चौकशीचे आदेश’ द्यावेत. त्यामुळे पूर्व-परवानगीची गरज नाही – ॲड. असीम सरोदे
-
उच्च न्यायालयात याच खारघर चेंगराचेंगरी मृत्यूप्रकरणी याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे पनवेलच्या न्यायालयाला आदेश देण्यात कायदेशीर अडचण नाही – ॲड. असीम सरोदे
-
या घटनेबाबत ठोस कृती न करता राज्य सरकार एक सदस्यीय समिती नेमून वेळकाढूपणा करत आहे – धनंजय शिंदे
-
यावरून सरकार ही दुःखदायक घटना विशेष गांभीर्याने घेत नाही हे स्पष्ट होतं – धनंजय शिंदे
-
देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाला सरकारी तिजोरीतून अंदाजे १३ कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे – धनंजय शिंदे
-
हवामान खात्यातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ४३ अंश सेल्सियस कडक उन्हात लाखो लोकांना सोहळ्यासाठी बसविण्यात आले – धनंजय शिंदे
-
हा सोहळा केवळ राजकीय फायद्यासाठी, अत्यंत बेजबाबदारपणे पेंडॉल, प्रथमउपचार आणि पिण्याच्या पाण्याच्या सोयीशिवाय आयोजित करण्यात आला – धनंजय शिंदे
-
सरकार तर्फे मृतांचा आकडा लपवून जबाबदारी झटकण्यासाठी असंवेदनशील विधाने करण्यात आली. मृतांचे शवविच्छेदन करण्यातही हलगर्जीपणा करण्यात आला – धनंजय शिंदे
-
या गुन्ह्यासंदभात आरोपींवर तक्रार व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १५६, १५६ (३) व एकत्रित वाचन कलम १९०, कलम २०० नुसार व भारतीय दंड संहिता १८६० कलम ३०४, ३०८, ३३६, ३३७, ३३८, ११४ नुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा – धनंजय शिंदे
-
कलम १५६ (३) फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, न्यायालयाने या दुर्घटनेची गंभीरपणे दखल घेऊन पोलिसांना सखोल चौकशी अहवाल न्यायालयात दाखल करण्याचे आदेश द्यावेत – धनंजय शिंदे
-
मृत्यूमुखी पडलेल्या १४ श्री सदस्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच जखमींना १० लाख रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात यावी – धनंजय शिंदे (सर्व छायाचित्र – संग्रहित)

“…तर माझेही तुकडे केले असते”, नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफांचा जीव; म्हणाले, “नान्या रिक्षा घेऊन…”