-
शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी रविवारी (१८ जून) वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहण्यापासून ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील आमदार मनिषा कायंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं.
-
ते वरळीत आयोजित राज्यव्यापी शिबिरात सहभागी झाले असताना माध्यमांशी नेमकं काय बोलले याचा हा आढावा…
-
ठाकरे गटाचा कोणता आमदार शिंदे गटात जाणार, त्याचं नाव माहिती आहे का? अशा लोकांचा कचरा इकडे तिकडे उडत असतो – संजय राऊत
-
हवेचा झोका बदलला की हा कचरा पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो. त्याकडे दुर्लक्ष करा. ते फार महान लोक नाहीत – संजय राऊत
-
शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत हे वक्तव्य चुकीचं आहे. याबाबत आदित्य ठाकरेंनी खूप चांगलं वक्तव्य केलं आहे – संजय राऊत
-
दुसरा मेळावा हा गद्दार दिनाचा मेळावा आहे. त्यांचा मेळावा शिवसेना दिनाचा नाही – संजय राऊत
-
ते ‘वाघ निघाले गोरेगावला’ असे बॅनर लावत आहेत. मात्र, त्यांची मराठी चुकते आहे. त्यांची शाळा घेतली पाहिजे. मी त्यांना शिकवतो – संजय राऊत
-
‘वाघाचे कातडे पांघरलेले लांडगे निघाले गोरेगावला’ असं बॅनरवर लिहिलं पाहिजे. सगळे वाघ तर शिवसेनेच्या या शिबिरात आहेत – संजय राऊत
-
उद्धव ठाकरे तहहयात आमचे पक्षप्रमुख आहेत – संजय राऊत
-
त्यांना पक्षप्रमुख करण्याच्या ठरावाची गरज नाही. ते ठराव इथं होत नाहीत. या तांत्रिक गोष्टी पूर्ण होत असतात – संजय राऊत
-
प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली. यानंतर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे या माणसाला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही – संजय राऊत
-
बावनकुळेंना महाराष्ट्र समजत नाही, विषय समजत नाही – संजय राऊत
-
हा प्रश्न त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि कबरीवर जाऊन औरंगजेबाला विचारावा. त्यांच्याच राज्यात ती औरंगजेबाची कबर आहे – संजय राऊत
-
बावनकुळे हे एक सदगृहस्थ आहेत. मात्र, त्यांना राजकीय ज्ञान नाही – संजय राऊत
-
त्यांना महाराष्ट्र माहिती नाही. त्यामुळे माध्यमांनी बावनकुळेंची वक्तव्ये फार गांभीर्याने घेऊ नयेत – संजय राऊत (सर्व छायाचित्र – संग्रहित, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स