-
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराजांनी लिंगनिदान दाव्यासंबंधी अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोठी घोषणा केली आहे.
-
महा. अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील आणि ॲड. रंजना गवांदे मंगळवारी (२० जून) पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
इंदुरीकर महाराज यांची सततची महिलांसंबंधी अपमानजनक वक्तव्य आणि गर्भलिंग निदानासंबंधीचा दावा हा स्त्रियांना दुय्यमत्व देणारा, पुरुषीव्यवस्थेला खतपाणी घालणारा आणि समर्थन देणारा आहे – अविनाश पाटील
-
त्यामुळे यासंबंधीचा खटला सुरू ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश हा महाराष्ट्रातील स्त्रीभ्रूणहत्येला पोषक स्वरूपाचे वर्तन व्यवहार करणाऱ्या सर्वच प्रकारच्या संबंधितांना चपराक देणारा आहे – अविनाश पाटील
-
उच्च न्यायालयाचा हा आदेश त्या अर्थाने स्त्रियांच्या जन्माच्या अधिकाराला विश्वास आणि स्वातंत्र्य देणारा आहे – अविनाश पाटील
-
इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आणि ते सतत स्त्रीयासंबंधी अपमानित वक्तव्य करत असतात – अविनाश पाटील
-
त्यामुळे त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कारवाई व्हावी. तसेच त्यांना दोन वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी – अविनाश पाटील
-
सम आणि विषम तारखेला स्त्रीशी संग केला; तर अनुक्रमे मुलगा व मुलगी होते, असे अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी संगमनेर, शेलद (ता. अकोले), उरण (जि. रायगड), बीड याठिकाणी जाहीरपणे केले होते – ॲड. रंजना गवांदे
-
या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे झालेल्या महिलांच्या मानहानीबाबत आणि गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या उल्लंघनाबाबत महा. अंनिसने अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकांकडे १७ फेब्रुवारी २०२० रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता – ॲड. रंजना गवांदे
-
महिलांना लाज आणणारे, त्यांचा विनयभंग करणारे, त्यांच्या अस्तित्वाला धोका पोहोचवणारे, स्त्रियांच्या समाजातील – कुटुंबातील वावरण्यावर प्रतिबंध आणणारे वक्तव्य करणे चुकीचे आहे – अविनाश पाटील
-
पुरुषांच्या बरोबरीने आपले स्थान निर्माण करण्याची सुरक्षितता देण्याची जबाबदारी असताना उलट महिलांना असुरक्षित करणारे कुठलेही वक्तव्य, वर्तनव्यवहार, भूमिका, निर्णय, धोरण अस्तित्वात असणे योग्य नाही – अविनाश पाटील
-
त्यामुळे पीसीपीएनडीटी कायद्याच्यानुसार आक्षेपार्ह ठरणारे इंदुरीकर महाराजांचे महिलांविषयक वक्तव्य आणि त्याचे समर्थन हे कायदेशीर गुन्हा ठरते, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्यामार्फत न्यायमूर्ती संत यांनी दिलेल्या आदेशातून स्पष्ट झाले आहे – अविनाश पाटील
-
इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात अशा स्वरूपाचे दावे जाहीरपणे केले आहेत – अविनाश पाटील
-
कीर्तनकार हा समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करीत असतो. त्याला मानणारा समाजातील काही वर्ग असतो. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारीने वक्तव्य करणे हे कायदेशीर बंधन असते, असे असतानाही इंदुरीकर महाराजांकडून वेळोवेळी उल्लंघन झाले आहे – अविनाश पाटील
-
भारतीय समाजात मुलगा हाच वंशाचा दिवा, वारस मानण्याची पद्धती स्वीकारली गेली आहे. त्यामुळे सोनोग्राफीमार्फत गर्भवती महिलेची तपासणी करून गर्भ मुलाचा की मुलीचा याची खात्री केली जात असे – अविनाश पाटील
-
त्यातून मुलीचा गर्भ काढून टाकण्याची वैद्यकीय पद्धती रूढ होऊ लागली होती. नवजात अर्भकांच्या लिंगविषयक संख्येमध्ये हजार मुलांच्या जन्मामागे ७०० मुली इतक्या खालपर्यंत जन्माची संख्या घसरली – अविनाश पाटील
-
त्यामुळे भारतीय समाजात स्त्रीपुरुष विषमतेला आणि त्यानिहाय अवलंबून असणाऱ्या सर्व मानवी व्यवहारांना मर्यादा यायला लागल्या. यासाठी अंधश्रद्धा, बुवाबाजी, दिशाभूल, फसवणूक आदी शोषणही सुरू झाले – अविनाश पाटील
-
या अशा दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या अनिष्ट पद्धतीच्या व्यवहारांना मर्यादा घालण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला लोकसंख्येतील स्त्री-पुरुष प्रमाणामधील दरी कमी करण्यासाठी मोठ्या पातळीवर जनप्रबोधन करावे असा प्रयत्न सुरू झाला – अविनाश पाटील
-
तसेच प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी कायदेशीर कार्यवाहीचे हत्यार म्हणून गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याअंतर्गत निर्माण करण्यात आले – अविनाश पाटील
-
पीसीपीएनडीटी कायदा हा गर्भलिंग निदान करण्यापासून रोखतो. तसेच स्त्री-पुरुष विषयक असमानतेला खतपाणी घालणाऱ्या प्रचार, प्रसार, प्रबोधन व जाहिरातीला प्रतिबंध करतो – अविनाश पाटील
-
त्यामुळे वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टरांपासून ते औषध निर्मिती व वितरण करणाऱ्या संस्था-कंपन्या यांनाही काही निर्बंध घालण्यात आले – अविनाश पाटील
-
याशिवाय हा कायदा समाजातील जनमताचा ठाव घेणाऱ्या आणि जनप्रबोधन करण्याचा दावा करणाऱ्या विविध क्षेत्रातील जबाबदार घटकांनाही मर्यादा घालतो – अविनाश पाटील
-
असं असलं तरीही कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी सम-विषम तारखेला स्त्री पुरुषांनी संभोग केल्यास मुलगा-मुलगी प्राप्ती होण्यासंबंधी दावे केले – अविनाश पाटील
-
यातून त्यांनी महिलांचा अपमान केला – अविनाश पाटील
-
अशुभ दिवसांना संभोग केल्यास आपले कुटुंब उद्ध्वस्त करणारी अपत्य निर्माण होतील अशा स्वरूपाचे दावे जाहीरपणे केले – अविनाश पाटील
-
ही सगळी वक्तव्ये सर्व महिलांचा आत्मसन्मान दुखावणारी आणि समाजाचा समतोल बिघवणारी आहेत – अविनाश पाटील
-
त्यामुळे त्यांच्याविरोधात महा. अंनिसच्यावतीने कायदेशीर कारवाईची भूमिका घेण्यात आली – अविनाश पाटील
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच