-
आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याच्या अंगावर धावून जात शर्ट खेचत मारहाण केल्याची घटना घडली.
-
या मारहाणीची चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे.
-
काशिमीरा येथील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मोहीम सुरू असताना हा प्रकार घडला.
-
यानंतर अभियंत्याला मारहाण का केली असा प्रश्न आमदार जैन यांना विचारला असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्या काय म्हणाल्या त्याचा हा आढावा…
-
कायदेशीर असो की बेकायदेशीर, जूनमध्ये कोणतंही घर तोडायचं नाही असा शासन आदेश आहे – गीता जैन
-
पावसाळ्यात अनधिकृत घरही तोडू शकत नाहीत. त्या अधिकाऱ्यांनी ते घर तोडलं – गीता जैन
-
मी इंजीनियरला तिथं बोलावलं आणि पावसाळा असून तुम्ही हे घर का तोडलं असं विचारलं – गीता जैन
-
घराच्या मालकाने त्याचं जे अनधिकृत बांधकाम होतं ते जेसीबी आणून तोडणार होता. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याचं पूर्ण घर तोडलं – गीता जैन
-
पीडित घरातील महिला रडून आम्हाला मारलं, छळ केला, खेचून नेलं, असं सांगत होत्या – गीता जैन
-
हा इंजीनियर उभं राहून त्या महिलेवर हसत होता – गीता जैन
-
त्या महिलेचा किती अपमान करायचा? एका महिलेचं घर जातंय. त्यामुळे ती रडत आहे. अशावेळी हा इंजीनियर हसत होता – गीता जैन
-
महिलेचा अपमान झाल्याने मला राग आला. म्हणून मी हात उचलला – गीता जैन
-
काशिमीरा येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. यावेळी एका झोपड्डीपट्टी बांधकामावर मंगळवारी कारवाई करण्यात आली.
-
मात्र, ही कारवाई करत असताना पालिका अधिकाऱ्यांनी नियामाचे पालन केले नसून केवळ विकासकाला फायदा पोहचवण्यासाठी हे बेकायदेशीर कृत्य केले असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत होता.
-
याबाबत माहिती घेण्यासाठी आमदार गीता जैन गेल्या होत्या. त्यावेळचाच व्हिडीओ व्हायरल झाला. यात त्या काय म्हणाल्या याचा आढावा खालीलप्रमाणे…
-
तुम्ही काय बोलले याच्याशी मला देणेघेणे नाही. तुम्ही घरमालकांना लेखी स्वरुपात काय दिलं ते मला दाखवा – गीता जैन
-
मी सभागृहात याबाबत प्रश्न विचारणार आहे – गीता जैन
-
पावसाळ्यात कुणाचंही घर तोडायचं नाही असा सरकारचा जीआर असताना आमचे दोन इंजीनियर जाऊन घरं तोडतात – गीता जैन
-
लहान मुलांना खेचून घराबाहेर फेकतात – गीता जैन
-
अरे काही माणुसकी आहे की नाही? तुम्ही राक्षस आहात का? – गीता जैन
-
तुम्हाला एवढी लहान मुलं दिसली नाहीत का? आज का तोंड बंद झालं आहे? – गीता जैन
-
त्या दिवशी तर ओरडत होतात ना. आता ओरडा – गीता जैन
-
यावेळी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील हे हसत होते.
-
त्यामुळे संतप्त जैन यांनी थेट पाटील यांच्या अंगावर जात त्याचा शर्ट खेचला आणि त्यांच्या कानाखाली मारली. (सर्व छायाचित्र – गीता जैन फेसबूक)
Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश