-
गेल्या काही दिवसांपासून राज्यात एका हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे.
-
आता या हत्याकांडातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
-
या हत्याकांडानंतर दर्शना पवार कोण? तिची हत्या का करण्यात आली? यामागचे नेमकं कारण काय? असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत.
-
दर्शना पवार ही राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली.
-
तिचा राज्यात तिसरा क्रमांक आला होता.
-
यानंतर राज्याच्या वनविभागात वर्ग-१ अधिकारी म्हणून नियुक्तीही झाली होती. पण त्यानंतर तिच्याच मित्राने तिच्या सर्व स्वप्नांची माती केली.
-
एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती.
-
दर्शना ही २६ वर्षांची होती.
-
दर्शना पवार यांचे वडील दत्ता पवार यांनी पोलीस जबाबात दिलेल्या माहितीनुसार, “दर्शना ९ जूनला पुण्यात एका खासगी कोचिंग क्लासच्या सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी आली होती.”
-
नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती.
-
१० जूननंतर तिचा कुटुंबियांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे १२ जूनला त्यांचे कुटुंबीय पुण्यात आले.
-
त्यांनी संबंधित कोचिंग क्लासमध्ये जाऊन चौकशी केली.
-
या सत्कार सभारंभानंतर तिने मैत्रिणीला सिंहगडावर जायचे आहे, असे सांगितले. तिने कुटुंबीयांनाही तसे कळवले होते.
-
तिचा मोबाईल बंद असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने त्यांनी शोध सुरू केला.
-
तिचा ठावठिकाणा न लागल्याने दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात देण्यात आली.
-
यानंतर १८ जून रोजी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तिचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
-
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृतदेहावर अनेक जखमा आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दर्शनाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
-
त्यानंतर तिचा मित्र आरोपी राहुल हंडोरे गायब झाला होता.
-
या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमध्येही राहुल आणि दर्शना दुचाकीवरून राजगड किल्ल्यावर पोहोचताना दिसले.
-
१२ जून रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास दोघेही दुचाकीवर दिसले.
-
पण सकाळी १०.३० च्या सुमारास दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल एकटाच बाईक चालवताना दिसला.
-
त्यामुळे संशयाची सुई त्याच्यावरच होती.
-
अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकातून बुधवारी रात्री ताब्यात घेतले.
-
लग्नाला नकार दिल्याने दर्शनाची हत्या केल्याची कबुली राहुलने दिली आहे.
-
दर्शनाच्या मामाच्या घराजवळ राहुलचे घर असल्याने या दोघांची जुनी मैत्री होती.
-
दर्शनाने एमएस्सी (मॅथ्स) आणि राहुलने बीएस्सीपर्यंतचे (बॉटनी) शिक्षण घेतले होते.
-
ते दोघेही स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होते.
-
तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये काम करत होता.
-
पुणे पोलिसांनी गुरुवारी (२२ जून) पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील तपासाची माहिती दिली.
-
वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड झाली होती.
-
पुणे पोलिसांनी गुरुवारी (२२ जून) पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील तपासाची माहिती दिली.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी