-
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरून ते त्यांच्या पहिल्या राज्यभेटीसाठी म्हणजेच राजकीय दौऱ्यासाठी अमेरिकेला पोहोचले आहेत.
-
याच निमित्ताने राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि त्यांची पत्नी जिल बायडेन यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. (PTI)
-
पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरिक्त मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा सुंदर पिचाई यांच्यासह व्यवसाय, फॅशन, मनोरंजन क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आणि अमेरिकन खासदारही या पार्टीत सहभागी झाले होते. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेत झालेल्या या कार्यक्रमात अनेक परदेशी दिग्गज चक्क भारतीय वेशभूषेत पाहायला मिळाले.
-
पाहूया या पार्टीत कोणत्या कोणी-कोणी भारतीय कपडे परिधान करून भारतावरील प्रेम व्यक्त केले आहे.
-
अमेरिकन वकील आणि राजकारणी ग्रेगरी मीक्स आणि त्यांची पत्नी सिमोन मीक्स व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनरसाठी पोहोचले. यादरम्यान सिमोन मीक्स यांनी सुंदर साडी नेसली होती.
-
संयुक्त राष्ट्रातील यूएस राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड आणि त्यांचे पती लाफायेट ग्रीनफिल्ड व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्टेट डिनरसाठी आले. यावेळी लिंडा देखील भारतीय पोशाखात दिसल्या. त्यांनी यावेळी एक लांब सूट परिधान केला होता.
-
व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी (OSTP)च्या संचालक आरती प्रभाकर आणि पॅट्रिक विंडहॅम, व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनरसाठी पोहोचले. यावेळी आरती प्रभाकर यांनी निळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.
-
अमेरिकेच्या प्रतिनिधी प्रमिला जयपाल आणि स्टीव्हन विल्यमसन व्हाईट हाऊसमध्ये डिनर पार्टीला पोहोचले. यावेळी प्रमिला जयपाल यांनी लांब सूट घातला होता.
-
यूएस काँग्रेसचे सदस्य आणि अब्जाधीश हेज फंड मॅनेजर नॅट सिमन्स आणि त्यांची पत्नी लॉरा बॅक्स्टर-सिमन्स व्हाईट हाऊसमध्ये डिनरसाठी आले. यावेळी लॉराने लांब सूट घातला होता.
-
इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सीईओ अरविंद कृष्णा आणि त्यांची पत्नी तारिणी कृष्णा व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनरसाठी पोहोचले.
-
यूएस काँग्रेस सदस्य अमी बेरा आणि त्यांची पत्नी जेनिन व्हिव्हिएन बेरा व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनरसाठी पोहोचले. यावेळी त्यांची पत्नी पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसली.
-
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मंदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. (All Photos: AP)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”