-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारची हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.
-
यानंतर चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आलं. अनेक प्रश्नही उपस्थित झाले. याच प्रश्नांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी उत्तर दिलं. त्याचा आढावा…
-
प्रश्न १. दर्शनाचा खून कुणी केला?
-
पोलीस – दर्शनाचा खून तिचा मित्र आरोपी राहुल हंडोरेने केला.
-
प्रश्न २. दर्शनाचा खून का झाला?
-
पोलीस – दर्शनाने आरोपी राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिल्याने वाद होऊन खून झाला.
-
प्रश्न ३. दर्शना पवार आणि तिचा खूनी राहुल हंडोरेंचं प्रेमप्रकरण होतं का?
-
पोलीस – दर्शना आणि आरोपी राहुल यांच्यात आधी प्रेमसंबंध होते का हे आत्ताच सांगता येणार नाही.
-
प्रश्न ४. आधी प्रेमसंबंध, नंतर ब्रेक अप आणि आता दर्शना अधिकारी झाल्यावर आरोपी राहुलने लग्नाची मागणी घातल्याने वाद होऊन हत्या झाली का?
-
पोलीस – दर्शना आणि आरोपी राहुल यांच्यात आधी प्रेमसंबंध होते का, ब्रेक अप झालं का याविषयी आम्हाला आत्ताच सांगता येणार नाही. त्यांची आधीपासून ओळख होती एवढंच तुम्हाला सांगू शकतो. सखोल चौकशीनंतरच त्यांचं प्रेम प्रकरण होतं की नाही हे समजू शकेल.
-
प्रश्न ५. आरोपी राहुल हंडोरे आणि पीडित दर्शना पवार नातेवाईक आहेत का?
-
पोलीस – आरोपी आणि पीडित मुलगी हे नातेवाईक नाहीत.
-
प्रश्न ६. लग्नाला दर्शनाने नकार दिला की तिच्या घरच्यांनी?
-
पोलीस – लग्नाला दर्शनाने नकार दिला होता.
-
प्रश्न ७. फरार झाल्यावर आरोपी कुठे कुठे गेला?
-
पोलीस – आरोपी रेल्वेने वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. तो पश्चिम बंगाललाही गेला होता. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या ठिकाणी गेला होता. आम्ही त्याला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक केलं.
-
प्रश्न ८. आरोपीने घरच्यांशी संपर्क केला होता का?
-
पोलीस – आरोपीने अधूनमधून घरच्यांशी संपर्क केला होता.
-
प्रश्न ९. आरोपी राहुल हंडोरेबरोबर आणखी कुणी होतं का?
-
पोलीस – आरोपी राहुल हंडोरेबरोबर आणखी कुणी होतं की नाही याची अद्याप माहिती नाही. ही प्राथमिक माहिती आहे. सखोल चौकशीत सर्व गोष्टी समोर येतील.
-
प्रश्न १०. लव्ह ट्रँगल आहे का? दर्शनाला इतर कुणी आवडत होतं म्हणून ती नाही म्हणाली का?
-
पोलीस – अद्याप तरी असं काही समोर आलेलं नाही. जर चौकशीत अशी माहिती समोर आली तर माध्यमांना त्याबाबत कळवू.
-
प्रश्न ११. आरोपी राहुल हंडोरे अंधेरीत काय करत होता?
-
पोलीस – आरोपी राहुल हंडोरे अंधेरी रेल्वे स्टेशनवर होता. तो कदाचित दुसऱ्या रेल्वेने पळून जाण्याच्या उद्देशाने आला असावा. तो नेमका तेथे का आला होता हे निश्चित माहिती नाही. तो रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती मिळाली आणि आम्ही त्याला अटक केलं.
-
प्रश्न १२. कोणत्या हत्यारांचा वापर करून हत्या?
-
पोलीस – दर्शनाची हत्या नेमकी कशी केली हे आरोपी नंतर सांगेलच. मात्र, घटनास्थळावर काही दगडांवर रक्त आढळलं आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात शरीरावर तीक्ष्ण हत्यारांचे वार झालेले दिसले आहेत.
-
प्रश्न १३. ठरवून ट्रेकिंगला जाऊन खून केला की ट्रेकिंगला गेल्यावर वाद होऊन खून झाला?
-
पोलीस – आरोपीने ठरवलं होतं का, कधी ठरवलं होतं, तयारी कशी केली होती, सोबत काही हत्यार घेऊन गेला होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं सखोल चौकशीतच समोर येतील. त्यावेळी आरोपीची मानसिक स्थिती काय होती हे सांगणं आत्ता घाईचं होईल. सखोल चौकशीनंतर या सर्व गोष्टी सांगू.
-
प्रश्न १४. आरोपीकडे हत्यार सापडले का?
-
पोलीस – अद्याप आरोपीकडे कोणतंही हत्यार सापडलेलं नाही. मात्र, पीडित दर्शनाच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराच्या खुणा आहेत. सविस्तर शवविच्छेदन अहवाल येणंही बाकी आहे.
-
प्रश्न १५. दर्शनाचा खून झाला तेव्हा नेमका घटनाक्रम काय घडला?
-
पोलीस – हत्येचा घटनाक्रम काय होता, गडावर त्यांनी गडावर काय काय केलं, हत्येची पद्धत काय होती हे दोन ते तीन दिवसांनी सखोल चौकशी केल्यावरच स्पष्ट होईल.
-
प्रश्न १६. दर्शना आणि आरोपी राहुल किती वाजता गडावर गेले?
-
पोलीस – आमच्याकडे जे परिस्थितीजन्य पुरावे आहेत त्यात असं दिसतंय की, दोघांनी सकाळी साडेआठ वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली.
-
प्रश्न १७. दोघे किती वेळ गडावर होते?
-
पोलीस – दोघे साडेआठ ते पावणेअकरा या वेळेत गडावर होते. नंतर परत येताना आरोपी एकटाच होता.
-
प्रश्न १८. गडावर काय घडलं याचा साक्षीदार आहे का?
-
पोलीस – गडावर काय घडलं याचा आमच्याकडे प्रत्यक्ष साक्षीदार नाही. मात्र, परिसरातील इतर साक्षीदार आहेत.
-
प्रश्न १९. मोटरसायकल जप्त केली का?
-
पोलीस – मोटरसायकल सापडलेली नाही. त्यामुळे अद्याप तरी जप्त केलेली नाही.
-
प्रश्न २०. आरोपी राहुल हंडोरे कोण आहे?
-
पोलीस – आरोपीही एमपीएससीची तयारी करत होता. तो गेल्या काही वर्षांपासून फूड डिलिव्हरी सर्व्हिसमध्ये अर्धवेळ नोकरी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. (सर्व छायाचित्र – संग्रहित व लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Ind Vs Pak : “आता तुझी भुवई जरा…”, शुबमन गिलच्या विकेटनंतर इशारा करणाऱ्या अबरार अहमदवर टीकेचा भडीमार