-
पुण्यात लेशपाल जवळगे या तरुणाने एकतर्फी प्रेमातून भरदिवसा एका माथेफिरूने केलेल्या कोयता हल्ल्यातून एका तरुणीचा जीव वाचवला.
-
यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्वच स्तरातून लेशपाल जवळगेचं कौतूक होत आहे.**78
-
अशातच आता लेशपालचे वडील चांगदेव जवळगे यांनी पुण्यातील कोयता गँगचा उल्लेख करत मनातील भीती व्यक्त केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
तिकडे पुण्यात कोयते गँगच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे त्याला काही झालं, तर अशी भीती मनात येते – चांगदेव जवळगे
-
आपला एकुलता एक मुलगा आहे, आपण त्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय, तर असं वेगळं काही घडू नये असं वाटतं – चांगदेव जवळगे
-
मुलीचा प्राण वाचवला हे चांगलं काम केलं आहे. त्याचा अभिमान वाटतो – चांगदेव जवळगे
-
माझी दोन्ही मुलं इंजिनीयर आहेत. मुलगा मॅकेनिकल इंजिनीयर आहे, तर मुलगी सिव्हिल इंजिनीयर आहे – चांगदेव जवळगे
-
इंजिनीयर झाल्यानंतर मुलाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचं म्हटलं. आम्ही त्याला कर म्हटलं – चांगदेव जवळगे
-
एकुलता एक मुलगा आहे आणि त्याची इच्छा आहे. आम्ही जे करतो ते त्याच्यासाठीच करतो आहे. म्हणून त्याच्या इच्छेप्रमाणे तो अभ्यास करत आहे – चांगदेव जवळगे
-
लेशपालने जे कर्तव्य पार पाडलं ते चांगलं केलं असं वाटतं. मला त्याचा अभिमान वाटतो. खेडेगावातील माणसानं असं कर्तुत्व करणं महत्त्वाचं आहे – चांगदेव जवळगे
-
हा प्रकार घडल्यावर लेशपालच्या बहिणीचा फोन आला आणि तिने तुम्हाला काही समजलं का असं विचारलं – चांगदेव जवळगे
-
त्यावर मी मला काही कळालं नाही, आमची शेतातील कामंच सुरू आहेत असं सांगितलं. त्यावर तिने लेशपालने (बापू) मुलीचा प्राण वाचवला असं सांगितलं – चांगदेव जवळगे
-
दर्शना पवारचं प्रकरण झाल्यामुळे मी लेशपालला आदल्या दिवशीच फोन केला होता – चांगदेव जवळगे
-
मी म्हटलं होतं की, तुम्ही दोघं बहिण-भावंडं तिथं आहात. नीट वागा, नाहीतर अशा घटना घडत असतील तर आपल्या घरी निघून या – चांगदेव जवळगे
-
त्यामुळे मुलीने या घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला तेव्हा मला तसंच वाटलं. तेव्हा मुलीने सांगितलं की, तसं काही नाही – चांगदेव जवळगे
-
मुलगा मुलीच्या मागे कोयता घेऊन पळत चालला होता. त्यावेळी लेशपाल अभ्यासासाठी ग्रंथालयात चालला होता. त्याच्यासमोर ही घटना घडली त्यामुळे त्याने कोयता धरला आणि मुलीचा प्राण वाचवला, असं मुलीने सांगितलं – चांगदेव जवळगे
-
मुलगा मुलीच्या मागे कोयता घेऊन पळत चालला होता. त्यावेळी लेशपाल अभ्यासासाठी ग्रंथालयात चालला होता. त्याच्यासमोर ही घटना घडली त्यामुळे त्याने कोयता धरला आणि मुलीचा प्राण वाचवला, असं मुलीने सांगितलं – चांगदेव जवळगे
-
यानंतर मग मी बरं बरं, त्याने चांगलं काम केलं असं म्हटलं. – चांगदेव जवळगे
-
आता मनात धाकधूक वाटते. डोक्यात अनेक प्रश्न येतात. एका दुकानदाराने शटर ओढलं होतं. त्यांना अपमान वाटला असेल तर काय – चांगदेव जवळगे
-
आपल्याला अभ्यास करायचा आहे, तिथं रहायचं आहे. त्यामुळे त्यांनी काही वैर ठेऊ नये. असं काही मनात आणू नये, पण शेवटी मनात येतं – चांगदेव जवळगे
-
सर्व छायाचित्र – लेशपाल जवळगे इंस्टाग्राम व लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी