-
मुंबईतील शाखेवर करण्यात आलेल्या कारवाईवरून शिवसेना ( ठाकरे गट ) आदित्य ठाकरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. ज्या दिवशी सरकार येईल. तेव्हा त्यांच्यावर बुलडोझर चालवल्याशिवाय राहायचं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
-
“गेल्याच आठवड्यात वांद्र्यात मुंबई महापालिकेच्या माजलेल्या अधिकाऱ्याने शाखेवर बुलडोझर चालवला. सगळ्यांनी पाहिले असेल.”
-
“पण, हातोडा चालवला. कोणाच्या फोटोवर चालवला? कोणी आणि कोणाच्या आदेशाने चालवला? आजपासून हेच ध्येय घेऊन चालायचे, ज्या दिवशी सरकार येईल. तेव्हा त्यांच्यावर बुलडोझर चालवल्याशिवाय राहायचं नाही,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
-
“मुंबई महापालिकेची एसआयटी चौकशी सुरु केली आहे. त्याप्रमाणे पुणे, ठाणे, नागपूर आणि नाशिकची सुद्धा करा. याबाबत राज्यपालांना आम्ही विनंती केली आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
-
“पाच रस्ते कंत्राटदारांना पाच पाकिटे देण्यात आली. पण, मी रस्त्यांचा विषय हाती घेतल्यावर जूनपर्यंत ४०० किलोमीटर नाहीतर, फक्त ५० रस्ते करू सांगितलं. यांना ५० शिवाय दुसरं काहीच दिसत नाही. जानेवारीतील काम एप्रिल, मे मध्ये सुद्धा सुरु केलं नाही. मग कोणते रस्ते तुम्ही पूर्ण करणार आहात?,” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
-
“५० रस्ते पूर्ण करू शकणार नाही, हे बोलल्यावर भाजपा, मिंधे गट आणि खोके सरकारने माझ्यावर टीका केली. तुम्ही मला पप्पू बोलताय ना… तुम्हाला पप्पू आव्हान देतोय, या अंगावर… एकटे या किंवा पूर्ण फौज घेऊन या. माझ्या छातीवर वार करण्यासाठी या… माझी तयारी आहे,” असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपाला दिलं आहे.

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल