-
अजित पवार सध्या राज्यातच नाही तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले आहेत. रविवार 2 जुलैला अजित पवार यांनी बंडखोरी करत नऊ आमदारांसह भाजपा आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला आहे. (गणेश शिरसेकर, इंडियन एक्स्प्रेस)
-
रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. (Photo: PTI)
-
खुद्द अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावेळी शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार उपस्थित होते. (गणेश शिरसेकर, इंडियन एक्स्प्रेस)
-
या सर्वांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही अजित पवारांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. (गणेश शिरसेकर, इंडियन एक्स्प्रेस)
-
पक्षात फुट पाडल्यानंतर अजित पवार तब्बल पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. (गणेश शिरसेकर, इंडियन एक्स्प्रेस)
-
अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे असून त्यांनी राजकारणाचे धडे या पक्षातच गिरवले आहेत. (Photo: Indian Express)
-
अजित पवार यांचे दहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाले. (Photo: PTI)
-
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी अजित पवार मुंबईत आले. मुंबईत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ते बारामतीला गेले. (Photo: PTI)
-
स्पष्ट वक्ते नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी आजवर अनेकांची शाळा घेतली आहे. मिश्किल आणि सूचक टीका करण्यात कोणीही त्यांची स्पर्धा करू शकत नाही. (Photo: PTI)
-
अजित पवार यांच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर २०१९ मधील निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार त्यांच्याकडे सुमारे ७५ कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आहे. (गणेश शिरसेकर, इंडियन एक्स्प्रेस)
-
अजित पवार यांच्या नावे तब्बल २७ कोटीहून अधिक किमतीची मालमत्ता आहे. तर पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे ४७ कोटींहून अधिक रकमेची मालमत्ता आहे.
-
स्थावर मालमत्तेमध्ये पवारांकडे पुण्यातील २० ठिकाणच्या जमिनी, चार निवासी इमारती व एक कर्मशियल इमारत आहे. तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे ६ शेतजमिनी, २९ भूखंड व तीन निवासी इमारती आहेत. (Photo: PTI)
-
इतकंच नाही तर, सुनेत्रा पवार यांच्याकडे ६१ लाखाचे दागिने, एक ट्रॉली, एक इनोव्हा कार व एक ट्रॅक्टर आहे तर अजित पवार यांच्या नावे दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर व १३ लाखाहून अधिक किमतीच्या सोन्या- चांदीच्या वस्तू आहेत. (Photo: PTI)
-
अजित पवार यांच्याकडे असलेल्या गाड्यांची एकूण किंमत सुमारे ८९ लाख रुपये इतकी आहे. दरम्यान, अजित पवार यांनी १ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या नावावर २ कोटी ६८ लाखांचे कर्ज आहे. (गणेश शिरसेकर, इंडियन एक्स्प्रेस)
-
आता नव्याने उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना शासनाकडून दरमहा ३ लाखापर्यंत पगार तसेच मोफत निवास सुविधा आणि वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता आणि सुविधा दिल्या जातील. (गणेश शिरसेकर, इंडियन एक्स्प्रेस)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा