-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नऊ सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गटांकडून मुंबईत अधिकृत बैठका होत आहेत.
-
अशात छगन भुजबळ यांनी शरद पवारांना भूतकाळातील गोष्टींच्या आठवण करुन दिल्या आहेत.
-
“या सगळ्याची पुनरावृत्ती झाली आहे” असं छगन भुजबळ म्हणाले.
-
“आजही माझ्या मनात शरद पवारांविषयी प्रेम आहे.”
-
“पण आपण वसंतदादा पाटील यांना सोडलं तेव्हा त्यांनाही असंच वाईट वाटलं.”
-
“बाळासाहेब ठाकरेंना मी आई-वडिलांच्या ठिकाणी मानत होतो.”
-
“पण ३६ लोक तुमच्याकडे आले होते, तेव्हा मलाही येणं भाग पडलं.”
-
“तुम्ही सांगितलं नाही की तिथे थांबा.”
-
“त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांनाही असंच वाईट वाटलं.”
-
“धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेतलं तेव्हा त्यांचे काका गोपीनाथ मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे यांनाही असंच वाईट वाटलं.”
-
“अजूनही काही बिघडलेलं नाही. अजित पवारांच्या नेतृत्त्वात आम्ही शेतकऱ्यांसाठी, ओबीसींसाठी, दलितांना न्याय देण्यासाठी काम करणार आहोत.” असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
-
“मला एक कळत नाही की, वारंवार दिल्लीत चर्चा केली जाते आणि काही दिवस झाले की त्यातून माघार घेतली जाते. त्यातून ते अनेक नेत्यांना तोंडघशी पाडत आहेत,” असं म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या धोरणाला लक्ष्य केलं.
-
(सर्व फोटो सौजन्य : छगन भुजबळ / फेसबुक)

१२ मार्च राशिभविष्य: मघा नक्षत्राबरोबर जुळून आलाय सुकर्म योग! १२ पैकी कोणत्या राशीला होणार फायदा आणि तोटा?