-
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहेत.
-
मात्र आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील प्रेम पुन्हा एकदा समोर आलं आहे.
-
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचे औक्षण केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून एक गट सरकारमध्ये सहभागी झाला आहे.
-
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली या गटातील एकूण ९ आमदारांनी पहिल्याच दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
यावेळी खुद्द अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे.
-
तर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
-
त्यानंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांचं स्वागत केलं होतं.
-
त्यानंतर धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (१६ जुलै) पंकजा मुंडे यांच्या वरळीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
-
याचा एक व्हिडीओ नुकतंच धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
या व्हिडीओत पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांचं औक्षण करताना दिसत आहेत.
-
यावेळी त्या चांदीच्या ताटात दिवा ठेवून भावाची ओवाळणी करताना पाहायला मिळत आहे.
-
त्याशिवाय त्यांनी एकमेकांना पेढा भरवून तोंड गोड केलं.
-
ओवाळणी झाल्यानंतर धनंजय मुंडे भावुक झाले.
-
यावेळी त्या दोघांनी एकमेकांची गळाभेटही घेतली.
-
“राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले”, असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
-
“आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे”, असे कॅप्शन धनंजय मुंडेंनी यावेळी दिले आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”