-
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपाबरोबर अनेकदा युतीची चर्चा केल्याचा आरोप केला.
-
यावर आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. ते शनिवारी (८ जुलै) नाशिकमध्ये बोलत होते. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
ते म्हणतात भाजपाबरोबर २०१४, २०१७, २०१९ मध्ये चर्चा झाली, पण निर्णय झाला होता का? – शरद पवार
-
राजकारणात चर्चा सगळी होते. अनेक गोष्टींवर चर्चा होते – शरद पवार
-
कधी डाव्या पक्षांबरोबर होते, कधी काही लोकांनी भाजपाचा प्रस्ताव दिल्यावर त्यावर चर्चा झाली – शरद पवार
-
पक्षात चर्चा होत राहिली पाहिजे – शरद पवार
-
चर्चेनंतर सामूहिक मत काय तयार होतं हे महत्त्वाचं असतं. त्यानुसार निर्णय राबवायचा असतो – शरद पवार
-
अनेकवेळा अनेकबाबतीत पक्षात चर्चा झाल्या आहेत – शरद पवार
-
चर्चा झाल्या याचा अर्थ निर्णय झालेला नाही. त्यामुळे जो निर्णय अंतिम आहे तोच खरा – शरद पवार
-
अजित पवारांना जितेंद्र आव्हाडांनी पक्षाचं नुकसान केलं असं वाटत असेल, तर ठीक आहे – शरद पवार
-
मात्र, जितेंद्र आव्हाडांनी कधीही भाजपात जायचं अशी भूमिका घेतली नाही – शरद पवार
-
ज्यांनी भाजपाबरोबर जाण्याची भूमिका घेतली, त्याने पक्षाचं नुकसान झालं की, जे पक्षाशी प्रामाणिकपणे राहतात, संघर्ष करतात त्यांनी नुकसान केलं याचा विचार करायला हवा – शरद पवार

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन