-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील राजकारणाविषयी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
-
ते ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात बोलत होते. त्याचा हा आढावा…
-
मी मुख्यमंत्री झालो त्या वेळी शरद पवारांचा गैरसमज होता की सोनिया गांधी यांनी त्यांना संपविण्यासाठी मला दिल्लीतून महाराष्ट्रात पाठविले होते – पृथ्वीराज चव्हाण
-
त्यांचा आजही तसा समज आहे. परंतु तसे काही नव्हते – पृथ्वीराज चव्हाण
-
‘आदर्श’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मला पाठविले होते – पृथ्वीराज चव्हाण
-
उलट १९९८ मध्ये जे घडले होते, ते, ते विसरले – पृथ्वीराज चव्हाण
-
काँग्रेसने त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद दिले – पृथ्वीराज चव्हाण
-
अर्थात शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष फोडल्याबद्दल माझ्या मनात अजूनही सल आहे – पृथ्वीराज चव्हाण
-
काँग्रेस पक्ष एवढा मोठा पक्ष होता, तो फोडून त्यांना काय मिळाले? आम्ही कमकुवत झालो, तसे तुम्हीही कमकुवत झालात – पृथ्वीराज चव्हाण
-
भ्रष्टाचाराबद्दल आक्रमकपणे बोलणे कर्नाटकमध्ये यशस्वी झाले, महाराष्ट्रातही असेच बोलले गेले पाहिजे – पृथ्वीराज चव्हाण
-
आमच्यातील मतभेद कमी करून, पदांचे वाटप करून प्रचार केला पाहिजे. परंतु अजून ते होताना दिसत नाही – पृथ्वीराज चव्हाण
-
गेल्या वर्षभरात शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडाळीमुळे प्रादेशिक पातळीवरील दोन पक्ष कमकुवत झाले – पृथ्वीराज चव्हाण
-
यापुढील काळात महाराष्ट्रात द्विपक्ष पद्धत अस्तित्वात येईल. तशी राजकीय वाटचाल सुरू झाली आहे. म्हणजेच काँग्रेस आणि भाजप अशीच लढत होईल – पृथ्वीराज चव्हाण
-
राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील अशी समाजमाध्यमांमध्ये चर्चा असली तरी तशी शक्यता लगेचच तरी दिसत नाही – पृथ्वीराज चव्हाण
-
शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच, तर त्यांना संसदीय मंडळात सामावून घेतले जाऊ शकते – पृथ्वीराज चव्हाण
-
महाराष्ट्रात आम्ही वज्रमूठ सभा घेतल्या, त्याचा अनुभव मला तरी काही चांगला आला नाही – पृथ्वीराज चव्हाण
-
उद्धवजींची तब्येत बरी नाही, मग ते उशिरा येतील, सगळ्यांनी बाजूच्या पोडियमवर बोलायचे, उद्धवजी आले की त्यांच्यासाठी मध्ये पोडियम ठेवायचा – पृथ्वीराज चव्हाण
-
हे काही बरोबर नव्हते, आम्ही ते बंद करून टाकले. पण पुढे एकत्र सभा होतील, सभा कराव्या लागतील – पृथ्वीराज चव्हाण
-
महाराष्ट्रात सध्या राजकीय आघाडीवर जे घडत आहे, त्याविरोधात काँग्रेसने आक्रमक व्हायला पाहिजे, परंतु आमच्यात आपापसात मतभेद आहेत – पृथ्वीराज चव्हाण
-
आधी ही गटबाजी संपुष्टात आणावी लागेल – पृथ्वीराज चव्हाण
-
राहुल गांधी यांनी तरुण नेतृत्व पुढे केले. वरिष्ठ लोकांना बाजूला केले – पृथ्वीराज चव्हाण
-
त्याचे अपेक्षित सकारात्मक परिणाम मिळाले नाहीत. कारण जुन्यांचा अनुभव व नव्यांचा उत्साह हे एकत्र करायला पाहिजे होते – पृथ्वीराज चव्हाण
-
पूर्वीच्या नेत्यांनी ते केले, परंतु आता राहुल गांधी यांनी फार आक्रमकपणे तरुणांकडे नेतृत्व दिले. ते यशस्वी झाले असे म्हणता येणार नाही – पृथ्वीराज चव्हाण
-
उदाहरणार्थ भाजपमध्ये पूर्वी काम केलेल्या नवज्योत सिद्धू यांच्याकडे पंजाब काँग्रेसची सूत्रे सोपविली – पृथ्वीराज चव्हाण
-
कॅप्टन अमिरदरसिंग यांच्यासह सारेच जुने नेते एका बाजूला आणि सिद्धू स्वतंत्र असे चित्र निर्माण झाले. अपमान झाल्याने अमिरदरसिंग बाहेर पडले – पृथ्वीराज चव्हाण
-
शेवटी निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसला राज्य गमवावे लागले – पृथ्वीराज चव्हाण
-
केवळ आक्रमकता आहे, म्हणून त्यांची विचारधारा काय आहे हे न बघता पक्षाची सूत्रे दिली – पृथ्वीराज चव्हाण
-
पक्षातून त्याला एखादे मंत्रीपद दिले असते तर हरकत नव्हती. याआधी या चुका झाल्या आणि त्या अजूनही होत आहेत – पृथ्वीराज चव्हाण
-
बसपामधून आलेल्या नेत्याला अचानकच उत्तर प्रदेशात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष केले गेले. बसपा व काँग्रेसमध्ये काय वैचारिक साम्य आहे? – पृथ्वीराज चव्हाण
-
सर्व छायाचित्र – संग्रहित

वेश्याव्यवसायातून महिलेची १५ वर्षांनी झाली सुटका, घरी पोहोचताच कुटुंबियांनी…