-
शिवसेनेच्या ज्येष्ठ महिला नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले आणि प्रश्न विचारण्यात आले.
-
या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना (पक्षप्रमुख) उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला इथपासून समान नागरी कायद्यापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याचा आढावा. त्या एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
-
काँग्रेसने राजीव गांधींच्या नेतृत्वात मुस्लीम महिला संरक्षण कायदा तयार केला. त्यावेळी खूप मोठा फटका बसला. ३०-३५ वर्षे महिला न्यायापासून वंचित राहिल्या – नीलम गोऱ्हे
-
काही हिंदू कायद्यांमध्येही बदल आवश्यक आहेत – नीलम गोऱ्हे
-
v
-
अशावेळी बाळासाहेब ठाकरेंनी राष्ट्रीय स्तरावर जी भूमिका घेतली जाते त्याचं समर्थन एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट करत आहे. हीच भूमिका राष्ट्रीय स्तरावर योग्य राहील असं मला वाटलं – नीलम गोऱ्हे
-
जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी कोविडची साथ आली. त्यामुळे भेटीगाठी कमी झाल्या – नीलम गोऱ्हे
-
कोविड काळातही मी २२ जिल्ह्यांमध्ये दौरा केला. त्याचा अहवाल उद्धव ठाकरेंना पाठवत होते – नीलम गोऱ्हे
-
प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी भेट घालून देत यांचे छोटे मोठे प्रश्न असतील तर सहकार्य करा असा सांगायचं होतं – नीलम गोऱ्हे
-
मात्र, कुठल्याच जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी अशा बैठका घेतल्या नाहीत. फक्त अधिकाऱ्यांवर अवलंबून राहत निर्णय घेतले जात होते – नीलम गोऱ्हे
-
मला असं जाणवलं की, मी १९९८ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा जे ध्रुवीकरण झालं होते, तशीच ध्रुवीकरणाची परिस्थिती २०२४ च्या आधी येणार आहे – नीलम गोऱ्हे
-
त्यात राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरची योग्य भूमिका घेणारा पक्ष म्हणून मी एकनाथ शिंदेंबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला – नीलम गोऱ्हे
-
निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरेंची मूळ शिवसेना पक्ष म्हणून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील पक्षालाच मान्यता दिली आहे. त्यामुळेच धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे आहे – नीलम गोऱ्हे
-
जेव्हा एकनाथ शिंदे गेले, गुवाहटीवरून परत आले, मुख्यमंत्री झाले त्यावेळी वाटत होतं की हा विषय तात्पुरत्या स्वरुपाच्या मंत्रीपदाचा असावा. त्यावेळी पक्षातून ६३ पैकी ४० एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार सोडून गेले – नीलम गोऱ्हे
-
त्यानंतर पक्षात संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने काही बदल होतील, त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे समजून घेतलं जाईल, असं वाटलं. मात्र, तसं झालं नाही – नीलम गोऱ्हे
-
एक वर्षानंतर अनेक जिल्ह्यांमधील लोकांशी माझं बोलणं झालं. उद्धव ठाकरे दौरे करत नसले, तरी मी काही ठिकाणी जाऊन आले होते – नीलम गोऱ्हे
-
त्यावेळी माझ्या लक्षात आलं की पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नीतीधैर्य खचत चाललं आहे. याला कारण म्हणजे रोज सकाळी होणारा वादविवाद. एवढा एकच कार्यक्रम – नीलम गोऱ्हे
-
या पलिकडे जाऊन शेतकऱ्यांचे विम्याचे प्रश्न, लोकांचे धान्याचे प्रश्न याबद्दल थातुरमातूर छोटी छोटी आंदोलनं सोडली, तर मोठी आंदोलनं झाली नाहीत – नीलम गोऱ्हे
-
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या भूमिकेतून काम झालं नाही – नीलम गोऱ्हे
-
कार्यकर्त्यांना विधायक व पक्ष बांधणीचा कार्यक्रम शिल्लक राहिला नव्हता – नीलम गोऱ्हे
-
सर्व छायाचित्र – संग्रहित व लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”