-
Chandrayaan-3 Launch India Moon Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ‘इस्रो’च्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-३’ मोहिमेचे २५.३० तासांची उलटगणती गुरुवारी सुरू झाली.
-
आज, शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता ‘एलव्हीएम३-एम४’ या प्रक्षेपणयानाच्या मदतीने चंद्रयान झेपावेल.
-
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसेच शाळांनी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे.
-
२०१९साली चंद्रयान-२ मोहिमेमध्ये ‘विक्रम’ या लँडरचे अलगद अवतरण करण्याचा प्रयत्न ‘इस्रो’ने केला होता.
-
या लँडरसोबत चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणारा ‘रोव्हर’ही धाडण्यात आला होता.
-
मात्र लँडर चांद्रपृष्ठावर कोसळल्यामुळे ही मोहीम अंशत: यशस्वी ठरली.
-
आता ‘चंद्रयान-३’ मोहिमेत या त्रुटी दूर करण्यात आल्याची माहिती ‘इस्रो’ने दिली आहे.
-
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हा लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे.
-
वैज्ञानिकांमध्ये ‘फॅट बॉय’ म्हणून ओळखले जाणारे एलव्हीएम-३ (पूर्वीचे जीएसएलव्ही-एमकेएल-२) हे प्रक्षेपणयान अतिशय जड वस्तूमान अंतराळात घेऊन जाण्यास सक्षम आहे.
-
आतापर्यंत प्रचंड यशस्वी ठरलेल्या या प्रक्षेपणयानाची ‘चंद्रयान-३’ ही चौथी मोहीम आहे.
-
‘चंद्रयान-३’ मोहिमेचे तीन मुख्य टप्पे
-
१. यान चंद्राच्या कक्षेत स्थिरावणे
-
२. चांद्रपृष्ठावर अलगद अवतरण (सॉफ्ट लँडिंग)
-
३. लँडरमधून रोव्हरची चांद्रपृष्ठावर सफर
-
(सर्व फोटो सौजन्य : भारतीय अंतराळ संशोधन संस्था / ट्विटर)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”