-
अजित पवार यांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या ८ आमदारांसह शिंदे-फडणवीसह सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पण, अजित पवारांच्या बंडाची कुणकूण लागली होती, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
-
“काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. अजित पवार हे सभेत फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करायचे. पण, फडणवीसांना मोकळे सोडायचे, हे जाणवत होते,” असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
-
बाळासाहेब थोरात म्हणाले, “करोनाच्या संकटात आम्ही चांगल्या पद्धतीने अडीच वर्षे काम केलं. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असे आम्हाला वाटत होते. पण, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मोठ्या संख्येने आमदार घेऊन बाहेर पडले, तेव्हा धक्का बसला. या बंडाचा आम्हाला वास सुद्धा आला नाही, याचं आम्हाला आश्चर्य वाटलं.”
-
“आता पुन्हा एक वर्षानंतर नवा धक्का मिळाला आहे. काहीतरी होणार असे वाटत असताना, अचानक अजित पवार सरकारबरोबर जात उपमुख्यमंत्री झाले. अजित पवारांकडील आमदारांचा आकडा अद्याप कळू शकला नाही. काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. कारण, महाविकास आघाडी म्हणून आम्ही खूप चांगले होतो. वज्रमूठ सभेमुळे लोकांमध्ये उर्जा निर्माण झाली होती,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
-
“त्यावेळी झालेल्या सर्वेत महाविकास आघाडीला लोकसभेच्या ३८ जागा आणि विधानसभेला १८० जागा मिळत असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे वाटायचं की भाजपाला आघाडी तोडण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा कुठूनतरी सिग्नल येत असायचे. ईडी आणि अन्य कारवाया वाढल्या हे सुद्धा सिग्नल होते,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
-
“अजित पवार सभेत फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करायचे. पण, फडणवीसांना मोकळे सोडायचे. हे जाणवत होते. अजित पवारांनी २०१९ सालीही शपथ घेतलीच होती. भाजपाला लोकसभेच्या निवडणुकीसाठी ही आघाडी तोडण्याची गरज वाटत असणार. त्यातून काही गोष्टी घडतील हे वाटत होते. कारण, अजित पवारांची काम करणे आणि राजकारण करण्याची पद्धत पाहता, हे घडणार वाटून जाणाऱ्या गोष्टी होत्या. शरद पवार यांचा राजीनामाही त्याचेच सिग्नल होता,” असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल