-
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचे कथिक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली.
-
यावरून विरोधकांनी किरीट सोमय्यांसह भाजपावर शाब्दिक हल्ला चढवला. याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले.
-
शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी या मुद्द्यावरून सडकून टीका केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या पत्रात असं कुठंही म्हटलं नाही की हा व्हिडीओ खोटा आहे – अनिल परब
-
त्यांनी असं म्हटलं की, मी कुठल्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही. याचा अर्थ तो व्हिडीओ खरा आहे – अनिल परब
-
त्यांनीच तो व्हिडीओ खरा आहे हे मान्य केलं असेल, तर त्या व्हिडीओच्या दुसऱ्या बाजूला कोण होतं, तो व्हिडीओ कुठे घेतला गेला, कोणी घेतला, का व्हिडीओ शूट केला हे स्पष्ट झालं पाहिजे – अनिल परब
-
हे त्या महिलेच्या संमतीने झाले आहे का, खंडणी म्हणून केलं आहे, धमकी देऊन केलं आहे का हे सगळं बाहेर आलं पाहिजे. म्हणून गृहमंत्री फडणवीसांनी या प्रकरणाची चौकशी करावी – अनिल परब
-
सीआयएसएफची सुरक्षा घेऊन छोट्या छोट्या अधिकाऱ्यांना सीबीआय, ईडी, इनकम टॅक्सची धमकी देऊन हे प्रकार झाले नाही ना? हे नीट तपासलं पाहिजे – अनिल परब
-
हे प्रकार चौकशीतून बाहेर येतील. केंद्रीय यंत्रणा आणि पोलिसांचा वापर करून हे झालं नाही ना हे शोधायला हवं – अनिल परब
-
म्हणून एसआयटी स्थापन करून चौकशी झाली पाहिजे, अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करतो – अनिल परब
-
आधी त्यांची सुरक्षा काढून घेतली पाहिजे. या सुरक्षेच्या जोरावरच असे प्रकार होत आहेत असं बाहेर बोललं जात आहे – अनिल परब
-
त्यांना सीआयएसएफची सुरक्षा कशाला हवी आहे? देवेंद्र फडणवीस सक्षम गृहमंत्री आहेत ना – अनिल परब
-
फडणवीसांच्या राज्यात त्यांना सुरक्षेची गरज काय? म्हणून ती सुरक्षा काढावी आणि चौकशी करावी – अनिल परब
-
विधानसभेत गेल्या काही वर्षा बरेच पेनड्राईव्ह बॉम्ब फुटले. आज हा पेनड्राईव्ह बॉम्ब विधानपरिषदेत आला आहे – अनिल परब
-
एका वृत्तवाहिनीवर भाजपाच्या एका माजी खासदाराचा एक व्हिडीओ प्रसारित झाला आणि तो व्हायरल झाला आहे – अनिल परब
-
यात कुणाचीही बदनामी होता कामा नये – अनिल परब
-
अंबादास दानवेंनी सांगितलं की, कुणाच्याही राजकीय जीवनातील बदनामीमुळे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त झालं, तर तो राजकारणाचा भाग आहे – अनिल परब
-
परंतु एखाद्याचं खासगी आयुष्य उद्ध्वस्त होतं, एखाद्याच्या कुटुंबावर प्रसंग येतो हा अनुभव आम्ही घेतला आहे – अनिल परब
-
चंद्रकांत पाटलांसह ‘पार्टी विथ डिफरन्स’ बोलणाऱ्या पक्षातील नेत्यांनाही मुलंबाळं आहेत. या मुलांना यंत्रणेसमोर उभं केलं जातं तेव्हा यंत्रणेचे लोक वेगवेगळे घाणेरडे प्रश्न विचारतात – अनिल परब
-
छगन भुजबळांनी अडीच वर्षे तुरुंगात घालवली आहेत. न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडलं. मात्र, त्या अडीच वर्षांची भरपाई कोण करणार? – अनिल परब
-
म्हणून या व्हायरल व्हिडीओच्या विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे – अनिल परब
-
हा प्रश्न किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील किंवा मी असा नाही. हा प्रश्न राजकीय जीवनात काम करणाऱ्या एका माणसाचा आहे – अनिल परब
-
राजकीय व्यक्ती आपलं राजकीय आयुष्य पणाला लावून इथपर्यंत आलेला असतो – अनिल परब
-
या व्यक्तींनी पोलिसांचा मार खाल्ला आहे, प्रचंड मेहनत केलेली असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आंदोलनातून आले आहेत – अनिल परब
-
जेव्हा अशा करियरवर आघात होतो, बदनामी केली जाते तेव्हा त्या बदनामीची उत्तरं इथंच दिली पाहिजेत म्हणून हे सभागृह आहे – अनिल परब
-
हे सभागृह न्याय मिळावा, कुणाची राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठीच आहे – अनिल परब
-
काल ज्या माजी खासदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला त्याने अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत – अनिल परब
-
म्हणून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं, अशी आमची इच्छा नाही. मात्र, या व्हिडीओची सत्यता बाहेर आलीच पाहिजे – अनिल परब
-
या व्हिडीओतील ती महिला कोण आहे हे कळलंच पाहिजे. त्या महिलेने का आरोप केले आहेत – अनिल परब
-
आम्हाला जी माहिती मिळाली ती खरी खोटी ती तपासून पहावी – अनिल परब
-
गृहमंत्री फडणवीस प्रत्येक गोष्टीत एसआयटी लावतात. आता माझं म्हणणं आहे की, एसआयटीच काय आमच्यामागे अगदी भारतीय गुप्तहेर संघटना रॉ लावा. कारण आमच्यामागे इतर कोणतीच संघटना लावणं राहिलेलं नाही – अनिल परब
-
फडणवीसांची राज्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही, असं आपल्या भाषणात हजारदा म्हटल्याचं आम्ही ऐकलं आहे. त्यांची तशी एक प्रतिमा आहे. अशा उपमुख्यमंत्र्यांना आज अशा प्रसंगाला सामोरं जावं लागत आहे – अनिल परब
-
तपास यंत्रणांमधील ज्या महिलांना आपली फाईल बघितली जाईल आणि त्या फाईलवर काही शेरा मारला जाईल, अशी भीती वाटत होती – अनिल परब
-
त्या महिलांना फोन करून हे प्रकार घडले आणि हे प्रकार ८ तासांच्या व्हिडीओत आले, असं आम्ही ऐकतो आहे – अनिल परब
-
खरं खोटं आम्हाला माहिती नाही. काही महिला अंबादास दानवेंना भेटल्या असतील, आम्हाला फोनद्वारे काही माहिती मिळाली असेल – अनिल परब
-
आता यातील सत्य शोधणं सरकारचं काम आहे. हे व्हिडीओ पाठवणारी महिला कोण हे महाराष्ट्राला कळलंच पाहिजे – अनिल परब (सर्व छायाचित्र – संग्रहित/लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…