-
आमदारांना करण्यात आलेल्या निधी वाटपावरून विधानपरिषदमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
-
“विधानपरिषद आणि विधानसभेतील आमदारांना असमान निधीचं वाटप झालं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील कामांची स्थगिती उठवली नाही. नवीन निधी मिळणे फार लांब राहिलं,” असे अंबादास दानवे यांनी म्हटलं.
-
“आमदारांना दिला जाणारा निधा हा जनतेच्या करातून दिला जातो. हा निधी काय सरकारची मालकी नाही. ज्या आमदारांना निधी दिला नाही, तेथील जनता करत भरत नाही का? त्यांना विकासाचा अधिकार नाही का?” असा सवाल अंबादास दानवे यांनी सरकारला विचारला आहे.
-
“असमान निधीचं वाटप निषेधार्य आहे. तेथील जनतेवर आणि आमदारांवर अन्याय आहे. एखाद्याला ५० कोटी, तर दुसऱ्याला ६० कोटी रुपयांचा निधी दिला जातो. पण, एखाद्याला २ कोटी रुपयांचा सुद्धा निधी मिळत नाही. त्यामुळे सरकारने आमदारांना समान निधी दिला पाहिजे. मात्र, द्यायचेच नाही ही भूमिका मागील काळात घेतली गेली,” असे अंबादास दानवे यांनी म्हटलं.
-
“भाजपाच्या आमदारांना २० कोटी, शिंदे गटाच्या आमदारांना ४० कोटी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना ५० कोटी रुपयांचा निधी दिला गेला,” असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.
-
यावेळी ‘५० कोटींचा आकडा कुठेही नाही,’ असा आक्षेप राष्ट्रवादीच्या बंडखोर गटातील आमदारांनी घेतला. त्यावर अंबादास दानवे म्हणाले, “मी दाव्यासहीत सांगेन की, ५० कोटी रुपयांचे फोन आले आहेत. मला कोणी कोणत्या नंबरवरून फोन केला, हे सांगायला भाग पाडू नका. मी सांगू शकतो. सर्वांना समान वाटप करण्यात यावे. कोणालाही देऊ नये, अशी माझी मुळीच इच्छा नाही.”

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”