-
नागपूर : चकाकणारी मेट्रो, रंगसंगतीत देखणे दिसणारे उड्डाणपूल आकाशात उडणाऱ्या ड्रोनद्वारे टिपून व हे शहर कसे वेगाने विकसित होत आहे याच्या चित्रफिती बनवून त्या मोठ्या अभिमानाने देशभर पसरवल्या जातात.
-
समाज माध्यमावर होणाऱ्या आभासी कौतुकाने हुरळून स्थानिक नेते व त्यांच्या ताब्यातील प्रशासनही आपण कशी जगावेगळी स्मार्ट सिटी घडवतोय याच्या मोठमोठ्या जाहिराती करतात. पुरस्कारही मिळवतात.
-
परंतु, आकाशातून टिपलेल्या या झगमगाटाखालच्या जमिनीवर मात्र खड्ड्यांनी रस्त्यांची कशी चाळण केली आहे, हे पाहायला त्यांच्याकडे कधीच वेळ नसतो.
-
यंदाच्या पावसाळ्यातही तेच घडत आहे.
-
शहरभरातील रस्त्यांवर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत.
-
काही ठिकाणच्या खड्ड्यात तर चक्क गुडघाभर पाणी साचले आहे.
-
खड्ड्यांमुळे दिवसभर वाहतूक मंदावून कोंडी होत आहे.
-
लोक एकमेकांवर धडकताहेत, जखमी होताहेत.
-
इंजिनमध्ये पाणी जाऊन दुचाक्या बंद पडताहेत.
-
पण, प्रशासन मात्र कमी वेळात कसे जास्त खड्डे बुजवले याच्या बढाया सांगण्यातच आपली ऊर्जा खर्च करीत आहे.
-
प्रशासनाच्या या बढाया कशा खोट्या आहेत व कागदावरच्या स्मार्ट सिटीला वास्तवातल्या खोल खड्ड्यांनी कसे विद्रूप करून टाकले त्याचे ‘लोकसत्ता’ने शहरभर फिरून गोळा केले हे पुरावे…
-
खोल खड्ड्यांची स्मार्ट सिटी!
-
रस्ता की जलतरण तलाव?
-
कामगार नगरातील एका रस्त्याचे हे चित्र बघितले की प्रशासनाने भररस्त्यावर सलग तीन जलतरण तलाव बांधले की काय, अशी शंका येते.
-
(सर्व छायाचित्रे – धनंजय खेडकर)

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का