-
गेल्या दोन दिवसांपासून बेफाम कोसळणाऱ्या पावसामुळे २००५ च्या २६ जुलै रोजी कोसळलेल्या पावसाची आठवण येऊ लागली आहे. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
मुंबईत आज (२७ जुलै) रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसंच, महाविद्यालयीन परिक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळपासून मुंबईत पावसाने जोर धरला असून अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात केली आहे. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
मुंबई उपनगरांत मंगळवारी सायंकाळी पावसाचा जोर वाढला होता. हा जोर बुधवारी दिवसभर होता. तर, गुरुवारीही मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. या पावसामुळे २६ जुलै रोजी पडलेल्या पावसाची आठवण मुंबईकरांना झाली. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
मुंबईत, उद्याही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे, अशा परिस्थितीत कोठेही अडकून पडू नये याकरता अतिमहत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
२६ जुलै २००५ रोजीही असाच मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबईतील उपनगरे दुपारपासून पाण्याखाली गेली होती. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
शाळा-महाविद्यालयांत गेलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणताना त्यांच्या पालकांची दमछाक झाली. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने रस्ते बंद झाले होते. तर, पावसाचे पाणी साचल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
वस्त्यांमध्ये पाणी शिरून घराघरांत पूर आला होता. चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे या पुरात अतोनात नुकसान झाले होते. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
२६ जुलै रोजी १२ तासांत वरुणराजाने ९४४ मिमी पावसाची नोंद केली. दुसऱ्या दिवशीही त्याचं तांडव संपलेलं नव्हतं. हे तांडव शांत झालं तेव्हा १०९४ लोकांना जलसमाधी मिळाली होती. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
हजारो लोक पाणी ओसरण्याची वाट पाहत जिथे जागा मिळेल तिथे जीव मुठीत घेऊन उपाशीतापाशी असहायपणे श्वास घेऊ पाहत होते. गळ्यापर्यंत येणाऱ्या पाण्यातून एकमेकांचा हात धरून वाट काढू पाहत होते. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
हा पाऊस इतका भीषण होता की, कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या अनेकांना घर गाठायला दोन दिवस लागले. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
ठाण्यापलिकडील नोकरदारवर्ग दोन दिवस मुंबईच्या पाण्यात अडकून होता. रस्ते वाहतूक बंद झाली होती. तर, रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलही ठप्प झाली होती. त्यामुळे माणसं मिळेल त्या पर्यायाचा वापर करून घर गाठत होते. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
मिठी नदीत आलेल्या पुरामुळे मुंबई बुडाली होती. त्यामुळे कधीही शांत न बसणारी मुंबई चलबिचल झाली. मुंब्रा-दिवा रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक जवळपास बंद होती. १० ते १२ दिवसांनी लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
बारवी धरणातूनही विसर्ग सुरू झाल्याने दिवा, डोंबिवली, कोपर, कल्याणसह अनेक आजूबाजूची शहरं पाण्याखाली गुडूप झाली होती. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
आशिया खंडातील नामांकित इकॉनॉमिक हब. शिवाय महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेलं महानगर पाण्याखाली गेल्याने १४ हजार घरे उद्ध्वस्त झाली होती. ४ हजार टॅक्सी, ३७ हजार रिक्षा, ९०० बेस्ट बसेसचं नुकसान झालं होतं. एकूण ५.५ बिलिअनचं हे नुकसान असल्याचं सांगितलं जातं. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
दरवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मुंबईत २००० मि. मी. पाऊस पडतो. त्यातील ७० टक्के पाऊस जुल आणि ऑगस्ट महिन्यांत पडतो. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
परंतु, निसर्ग चक्र बदलत असल्याने तीन महिन्यांत पडणारा पाऊस एकाच महिन्यात पडतो, त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
२००५ ची आपत्ती ही तेव्हाची १०० वर्षांतील सर्वाधिक भीषण नैसर्गिक आपत्ती होती. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
अचानक ओढावलेल्या या परिस्थितीमध्ये प्रशासनही चक्रावून गेले होते. परंतु, त्याही परिस्थितीत जमेल तितकी मदत आणि बचावकार्य प्रशासनकडून सुरू होतं. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
मुंबईत एवढा मुसळधार पाऊस कोसळणार आहे, याचा अंदाज तेव्हा हवामान खात्यालाही आला नव्हता. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
त्यामुळे संपूर्ण मुंबईत निर्धास्त होती. परंतु, २६ जुलै रोजी दुपारी २ वाजल्यापासून पावसाने हाहाकार माजवला. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने बचावकार्यासाठी बोटींचा वापर करण्यात आला होता. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
घरांदारात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार भिजले होते. कपडा-लत्ता, भांड्यांपासून ते दाग-दागिनेही वाहून गेल्याची आठवण काहीजण सांगतात. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
“जाण्याची वेळ झाली…”, अमिताभ बच्चन यांची पोस्ट