-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासून आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे हे आपल्या आक्रमक शैलीमुळे ओळखले जातात. पण, धनंजय मुंडे यांना आपण कायम गळ्यात गमछा घातलेलं पाहिलं आहे.
-
मात्र, धनंजय मुंडे यांनी गमछा घालण्याचं कारण सांगितलं आहे.
-
धनंजय मुंडे म्हणाले, “याला काही ठिकाणी पंछा, उपरणे, गमजा आणि गमछा म्हणतात. माझ्यासाठा हा गमछा आहे. माझे वडिल गमछा कायम वापरत असे. त्यामुळे मी जमेल तेवढं काय वापरतो.”
-
“आज माझे वडिल हयात नाहीत. पण, गळ्यात गमछा असल्यावर वडिलांचा हात खांद्यावर असल्याचं जाणवतं. आधार असतो,” असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
-
“शरद पवार हे आमचा आधार आणि दैवत आहेत. पण, भाजपाचा आधार घेणं किंवा बरोबर जाणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घेतलेली भूमिका आहे. ५ जुलै रोजी झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे,” असेही धनंजय मुंडे म्हणाले.
-
“ईडी, इन्कम टॅक्सच्या नोटीसा आज नाहीतर, गेल्या अनेक वर्षापासून आल्या आहेत. मात्र, याच्या भीतीने आम्ही भाजपाबरोबर गेलो, हे लोकांमध्ये पसरवलं जातं. राष्ट्रवादीच्या उभारणीत स्वाभीमान हा विषय होता. हा पक्ष लोकशाही मानणार आहे. आमच्यासाठी दैवत आणि आधारस्तंभ शरद पवारच आहेत. लोकप्रतिनिधींची कामे आणि मतदारसंघाचा विकास होणे याला आमदार म्हणून आम्ही उत्तरदायीत्व आहे,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…