-
देशाचे गृहमंत्री अमित शाह आज ( ८ जुलै ) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ही भेट घडवून आणल्याचं सांगितलं जातं होतं. पण, या सर्व चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत. एखाद्याबद्दल महाराष्ट्रात गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरु झाला, तर बरोबर नाही, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना फटकारलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
-
जयंत पाटील म्हणाले, “रोज सकाळी उठून स्पष्टीकरण देण्याचा उद्योग सुरु केला आहे का? तुम्ही बातम्या तयार केल्यात, तर तुम्हीच त्या बंद करा. मी कुठे आणि का गेलो? याचे पुरावे दिसले किंवा माहिती मिळाली, तर बातम्या करा.”
-
जयंत पाटील म्हणाले, “रोज सकाळी उठून स्पष्टीकरण देण्याचा उद्योग सुरु केला आहे का? तुम्ही बातम्या तयार केल्यात, तर तुम्हीच त्या बंद करा. मी कुठे आणि का गेलो? याचे पुरावे दिसले किंवा माहिती मिळाली, तर बातम्या करा. एखाद्याबद्दल महाराष्ट्रात गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरु झाला, तर हे बरोबर नाही. पण, सकाळपासून बातम्या पाहून माझी करमणूक होत आहे.”
-
“अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा मी आणि माझ्याबरोबरचा एक सहकारी रात्री दोनपर्यंत घरीच बसलो होतो. मग पुण्याला कधी गेलो? काल संध्याकाळी आणि आज सकाळी मी शरद पवारांच्या घरीच होतो. मग मी कधी अमित शाहांना भेटलो? याचं संशोधन करा,” असेही जयंत पाटील यांनी म्हटलं.
-
“कुठे जायचं असेल, तर भेटून सांगेन. पण, विनाकारण बातम्या चालवल्या जातात. पक्ष व्हावा हा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मी आहे इथेच आहे. प्रसारमाध्यचं इकडे जाणार, तिकडे जाणार असल्याचं सांगतात,” असेही जयंत पाटील म्हणआले.
-
भाजपा आणि अजित पवार गटाकडून खोट्या बातम्या पसरवून तुम्हाला डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे का? हा प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले, “भाजपा आणि अजित पवार गट अशा बातम्या पेरतो, असं मी म्हणणार नाही. बातम्या पेरणारे हे प्रसारमाध्यमे आहेत. बातम्या पेरल्याचा पुरावा माझ्याकडे नाही आहे. ‘जयंत पाटील भुलले’ अशीही बातमी चालवली गेली. माझी प्रसिद्धी करताय, याबद्दल मी प्रसारमाध्यमांचे आभार मानतो.”

होळीच्या दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशींना मिळणार जबरदस्त धन लाभ, चंद्र-शुक्राच्या कृपेने मिळेल अपार श्रीमंती