-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु झाली.
-
त्यामुळे जयंत पाटील यांच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण झालं होतं. पण, आपण अमित शाह यांची भेट घेतलेली नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
-
आता या चर्चांवर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
-
‘इंडिया’ आघाडीची बैठक पार पडणार आहे. त्यापूर्वी जयंत पाटील यांच्याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत, असा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “जयंत पाटील शनिवारी ( ५ जुलै ) ‘इंडिया’ आघाडीबद्दल झालेल्या बैठकीत उपस्थित होते. ही बैठक यशस्वी होण्यासाठी जयंत पाटील यांनी रविवारीसुद्धा ( ६ जुलै ) बैठका घेतल्या आहेत.”
-
“आपला नेता आणि पक्ष संकटात असताना पळून जाणाऱ्या पळपूट नेत्यांपैकी जयंत पाटील नाहीत.”
-
“जयंत पाटील आणि आमचा डीएनए एकसारखा आहे. आम्ही पळपूटे आणि डरपोक नाहीत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख